पुणे–सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अमोल पालेकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ७७ वर्षीय अभिनेत्याला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या आजारपणाची बातमी समजताच चाहत्यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमोलची पत्नी संध्या गोखले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अमोल पालेकर यांना झालेल्या एका दीर्घ आजारवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी दिली आहे. आता त्यांच्यावर उपचार सुरु होत असून आता काळजी करण्यासारखं कोणतंही कारण नसल्याचं संध्या गोखले यांनी सांगितलं. अमोल पालेकर यांना अतिधुम्रपान केल्यामुळे त्रास झाला होता. त्यामुळे १० वर्षांपूर्वी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अमोल पालेकर यांनी ७० आणि ८० च्या दशकात मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत एक वेगळ्या ढंगाचा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण केली.फक्त विनोदी भूमिकाच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ताकदीनं साकारणारा अभिनेता म्हणून अमोल पालेकर यांच्या पाहिलं जातं. एक उमदे चित्रकार असणाऱ्या अमोल पालेकर यांनी सिनेसृष्टीतत येण्याआदी एका बँकेत नोकरी केली होती. बँक ऑफ इंडियात अमोल पालेकर क्लार्क म्हणून काम करायचे.