तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है, देखें अबके किसका नंबर आता है ! अमृता फडणवीस यांच्या या ट्वीटला रूपाली चाकणकर यांनी दिले हे उत्तर


पुणे- तौक्ते चक्रिवादळाने मुंबई शहराला सोमवारी जोरदार धक्का दिला. चक्रीवादळामुळे मुंबई शहराला वादळी वारे आणि जोरदार पावसाने झोडपले आहे. समुद्राच्या लाटा , सगळीकडे पाणीच पाणी आणि झाडे उन्मळून पडली आहेत. तर जोरदार वाऱ्यामुळे कोविड सेंटरसाठी उभारण्यात आलेल्या टेंडचे नुकसान झाले आहे. या तुफानाने संपूर्ण मुंबई शहराला फटका बसला आहे. याचा संदर्भ देत आपल्या ट्वीटने कायम चर्चेत असलेल्या विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणीवीस यांनी ट्वीट केले आहे.

तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है, देखें अबके किसका नंबर आता है !

असे ट्वीट करून त्यांनी त्याआडून पुन्हा एकदा राजकीय वादळाचे संकेत अधोरेखित केले आहेत. त्यांच्या या ट्वीटला राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही ट्वीट त्याच स्टाईलने उत्तर दिले आहे.

अधिक वाचा  महाविकास आघाडी सरकारचे एकमेकांचे पाठ खाजवणे हे मला खूपच आवडते - अमृता फडणवीस

तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !!

असे ट्वीट त्यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love