#Raj Thackeray : एकमेकांना मान द्या, तर प्रेक्षक तुमचा मान राखतील – राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला

Respect each other, and the audience will respect you
Respect each other, and the audience will respect you

Raj Thackeray :  मी जेंव्हा इतर भाषेतील कलाकारांना (Artist) भेटतो तेंव्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारतात. मात्र, मराठी कलाकार (Marathi Artist) एकमेकांसोबत त्या आदबीने वागताना दिसत नाही. तुम्ही जर एकमेकांना मान नाही दिला तर, प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? त्यामुळे एकमेकांना मान द्या अन् दुसऱ्याचा मान ठेवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी रविवारी मराठी  कलाकारांना दिला. (Respect each other, and the audience will respect you)

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात (100th All India Marathi Drama Conference) आज राज ठाकरे यांची ‘नाटक आणि मी’ (drama and me) या विषयावर मुलाखत झाली, यावेळी ते बोलत होते. अभिनेते दीपक करंजीकर (Deepak Karanjikar) यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल(Jabbar Patel) , अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले(Prashant Damale), नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर(Bhausaheb Bhoir) , नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल(Krishnakumar Goyal) , सचिन इटकर आदि  उपस्थित होते.

अधिक वाचा  मनसेच्या ॲड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना अटक व सुटका; काय केलं होतंं रुपाली पाटील यांनी?

मराठी नाट्यसृष्टी व चित्रपट सृष्टीतील लोकांनी एकमेकांचा आदर करावा,  मराठी चित्रपट मोठे आहेत मात्र मराठी चित्रपटांना स्टार नाही,ही शोकांतिका आहे. तमिळ, तेलगू अशा इतर चित्रपटसृष्टीमध्ये स्टार आहेत, मराठी चित्रपट सृष्टीत स्टार नाही. तुम्ही जर तुमचा मान राखला नाही तर लोक तुम्हाला मान देणार नाहीत. मराठी कलाकार एकमेकांशी बोलताना टोपण नावाने आरे तुरे हाक मारतात. रजनीकांत (Rajanikant) आणि इलाईराजा (Ilairajaa) हे रात्री एकांतात एकमेकांना एकेरी बोलत असतील पण लोकांसमोर आल्यावर ते एकमेकांना सर म्हणून हाक मारतात. त्यांचे एकमेकांशी कसेही संबंध असले तरी ते चार भिंती बाहेर आल्यावर ते एकमेकांचा आदराने उच्चार करतात.

मराठी चित्रपट सृष्टीत अशोक सराफ यांना मामा म्हटलं जातं. अरे पण ते तुमचे सख्खे मामा आहेत का? त्यांना आदरणाने अशोक सराफ सर म्हणा. राजकीय भाषेत सांगायचे झाल्यास इथे शरद पवार आले, तर मी त्यांच्या वाकून पाया पडेन. तीच आपली संस्कृती आहे,” असे ते म्हणाले.

अधिक वाचा  भविष्य निर्वाह निधी अंशदान रक्कम स्विकारली जात नसल्याने लाखो कामगारांना मनस्ताप : सुधारित अध्यादेश काढण्याची भारतीय मजदूर संघाची मागणी

शंभराव्या नाट्य संमेलनात  माझ्या मुलाखतीचा विषय ‘नाटक आणि मी’ असा आहे. मात्र मला वाटते मुलाखतीचा विषय ‘मी केलेली नाटकं’ असा हवा होता, अशी मिश्किल टिपणी करत राज ठाकरे म्हणाले, नाटक न पाहीलेला मराठी माणूस सापडणे अवघड आहे. मराठ्यांचा इतिहास पाहिला तर तो नाटक ते अटक असा आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथेच मोठे झाले. आपण राज्यकर्ते होतो पण आपण आपला इतिहास विसरत चाललो आहोत. शंभर फोटो इथे लागले आहेत त्यांना आजची अवस्था बघितल्यावर काय वाटत असेल? फिल्म मेकिंग हे  माझं पहिलं प्रेम आहे, मात्र नाटकाबद्दल माझ्या मनात कायम कुतूहल आहे. चित्रपट, मालिका आणि नाटकं यामध्ये नाटक हे सर्वात आव्हानात्मक माध्यम आहे असे मला वाटते. परदेशात गेल्यावर आपण मोठमोठी नाट्यगृह पाहतो. उत्तम दर्जाची नाटकं पाहतो. ती आपल्याकडे पण व्हायला पाहिजेत. त्यासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी प्रस्ताव तयार करावा. तुमची मागणी पूर्ण व्हावी म्हणून मी पुढाकार घेईल, असा शब्द देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

अधिक वाचा  #Raj Thackeray : मराठा-ओबीसी वाद घडवला जातोय : नाट्य संमेलनात महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर  राज ठाकरेंचे फटकारे

दरम्यान, सध्या राज्यात जे जाती पातीचे राजकारण सुरू आहे. त्यामध्ये मराठी माणसाने अडकु नये असे ठाकरे यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love