मंदिरे खुली करण्यासाठी मनसेचे कसबा गणपती मंदिरात होमहवन आणि आरती


पुणे— राज्यातील मंदिर खुली करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे. आज पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात मनसे कडून होमहवन आणि आरती करण्यात

पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे हे कार्यकर्त्यांसह प्रवेश करून, राज्यातील लवकरात लवकर मंदिरे सुरू करण्याची बुद्धी, या सरकारला देण्याची प्रार्थना गणराया चरणी केली. तसेच यावेळी मंदिरात होमहवन देखील करण्यात आला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  आरती आणि होमहवन देखील करण्यात आली.

कोरोनाशी लढताना सर्व स्तरावर सरकार अपयशी ठरल आहे.तर दुसरीकडे हॉटेल आणि दारूची दुकाने सुरु केली, मात्र मंदिर का सुरु करत नाही असा सवाल मनसेने विचारला आहे त्यामुळे मंदिर खुली केली नाहीतर भविष्यात मनसेकडून उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला आहे. .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #कल्याणीनगर ‘हीट अँड रन’ प्रकरण : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्यासह सात जणांना अटक : बार चालक आणि कर्मचारी यांची २४ मे पर्यंत पोलीस कोठडी