नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—आपल्याकडे कर असेल आणि या कारच्या विम्याचे नुतनीकरण करायचे असेल तर आपल्यासाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. यापुढे कारच्या विम्याचे नुतनीकरण करताना कारचे प्रदूषणपत्र (पीयूसी) असल्याशिवाय नुतनीकरण करता येणार नाही. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) सर्व विमा कंपन्यांना या संदर्भात सूचना जारी केल्या आहेत. तसेच आपल्या कारचा कधी अपघात झाला आणि त्यावेळी कारचे पीयूसी केलेलं नसेल तर आपल्याला विम्याचा दावा (इन्शुरन्स क्लेम) मिळणार नाही. याचाच अर्थ असा की कारच्या विम्याचे नुतनीकरण आणि विम्याच्या दाव्यासाठी हे दस्तऐवज असणे आवश्यक असणार आहे.
आयआरडीएने 20 ऑगस्ट 2020 रोजी जारी हे परिपत्रक जारी केले आहे. त्यात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) प्रदूषणाच्या बाबतीत अनुपालन स्थितीचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच कंपन्यांना सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. आयआरडीएने असे नमूद केले आहे की केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय राजधानी दिल्ली (दिल्ली-एनसीआर) मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आयआरडीएने म्हटले आहे की एसीएसमधील विमा कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे हे सुनिश्चित केले पाहिजे.