पुणे(प्रतिनिधी)- पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरातील पोर्श कार अपघातात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या जामिनाला विरोध करण्याकरिता सर्वौच्च्च न्यायालयात केस दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांनी गृह विभागामार्फत राज्याचे विधी व न्याय विभागाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून याबाबत परवानगी मिळाली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
पोर्शे कार अपघातात मागच्या १९ मे रोजी दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर येरवडा पोलिसांनी संबंधित १७ वर्षीय मुलास बालन्यायालयात हजर केले होते. परंतु बालन्यायालयाने त्यास तात्काळ सर्शत अटीवर जामीन मंजूर दिला होता. मात्र, याबाबत जनमानसता प्रतिक्रिया उमटल्यानंतर मुलास बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानंतर तब्बल २८ दिवस आरोपी बालसुधारगृहात असून, दबावाखाली कारवाई केल्याची याचिका त्याच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने बालन्यायालय व पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित करत ताशेरे ओढले होते. त्याचबरोबर या मुलाचा जामीन मंजूर करण्यात आला होता. आता पोलीस या निर्णयास सर्वौच्च न्यायायलयात आव्हान देणार आहेत.
















