पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौरभ अमराळे यांची निवड

Selection of Saurabh Amarale as President of Pune City Youth Congress
Selection of Saurabh Amarale as President of Pune City Youth Congress

पुणे(प्रतिनिधि)–पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौरभ अमराळे यांची वर्णी लागली आहे. इंडीयन युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी महाराष्ट्र युथ काँग्रेसच्या काही पदांसह  विविध जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.त्यात पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सौरभ अमराळे यांच्यावर  सोपवली आहे.

सौरभ अमराळे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून गेले १५ वर्षे कार्यकर्ता, उपाध्यक्ष ,वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही भरीव कामगिरी केली आहे.तसेच ते  विविध संघटनांचे पदाधिकारी असून सामाजिक कार्यातही सदैव अग्रेसर असतात.विशेषतः संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे पाहून त्यांच्यावर आता पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

या निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सौरभ अमराळे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसारच आजवर कार्य केले आहे.पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देवून युवक काँग्रेसच्या माध्यमातून  पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविताना युवा वर्गाचा जास्तीस जास्त सहभाग काँग्रेस पक्षात व्हावा यासाठी कार्यरत आहे.आता अध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे.ती आ लेणखी कार्यक्षमतेने निश्चितच पार पाडणार अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिल

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #Prakash Ambedkar |आमच्यासाठी अजून इंडिया आघाडीची दारे बंद आहेत : प्रकाश आंबेडकर