#Prakash Ambedkar |आमच्यासाठी अजून इंडिया आघाडीची दारे बंद आहेत : प्रकाश आंबेडकर

Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy
Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

Prakash Ambedkar : इंडिया आघाडीत (India Aghadi) जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. परंतु आमच्यासाठी अजून इंडिया आघाडीची दारे बंद आहेत. आघाडीत आम्हाला कधी घेतले जाणार याचा निर्णय त्यांनी घ्यावयाचा आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे(Vanchit Bahujan Aghadi)  नेते प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedka) यांनी सोमवारी येथे व्यक्त केली. (India’s front doors are still closed for us)

कोरेगाव भीमा(Koregaon Bhima) येथील विजयस्तंभाला ( victory column) अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आंबेडकर म्हणाले, इंडिया आघाडीने (India Front) अजून आमच्यासाठी दारे उघडलेली नाहीत. याबाबत आता काय तो निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते शरद पवार(Sharad Pawar) व आम्ही लवकरच एकत्र येणार आहोत. त्यामुळे औपचारिक-अनौपचारिक कधी ना कधी भेट होणार आहे. वारंवार भेटी होत राहणार. सत्तेत येणे व संविधान वाचवणे, हाच नवीन वर्षाचा संकल्प आहे. मराठा व ओबीसीत समाजात भांडणे लावण्यात आली आहेत. ती वाढणार नाहीत आणि योग्य तोडगा निघून राज्याची शांतता टिकवणे, हाही आमचा नवीन वर्षाचा संकल्प आहे. 

अधिक वाचा  पुणेकरांसाठी खुला झाला दुर्मिळ नाण्यांचा खजिनाः 'कॉईनेक्स पुणे २०२२' चे उद्घाटन : दुर्मिळ नाण्यांची खरेदी-विक्री करण्याची संधी

 एनडीएला 400 जागा मिळतील : रामदास आठवले 

विजयस्तंभ ( ( victory column) अभिवादन केल्यानंतर आरपीआयचे(RPI) अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athaval)  म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedka)  यांनी आम्हाला अन्यायाविरोधात लढण्यास शिकवले आहे. यावषी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होईल. त्यात पंतप्रधानपदावर पुन्हा नरेंद्र मोदी(Narendra Modi)  हेच निवडून येतील. एनडीएला (NDA) 400 पेक्षा अधिक जागा मिळतील व सर्व दलित संघटना, कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. एनडीएचे निमंत्रक कोणायला करायचे, यावरून कोणताही वाद नाही. परंतु इंडिया आघाडीत याबाबतचा वाद सुरू आहे. आम्हाला आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात 18 जागा मिळाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love