पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण:आत्महत्या की घातपात?


पुणे- पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून  उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.-बीड येथील २३ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे. दरम्यान, पोलीस याबाबत अधिक  देण्यास तयार नाहीत. दरम्यान ,पूजाच्या शवविच्छेदन  अहवालात तिच्या डोक्याला जबर मार लागून तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्मोर येत आहे. तर पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याची सांगितले जात आहे. 

पूजा पुण्यात राहत असलेल्या हेवनपार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. महाविकास  आघाडी सरकार मधील मंत्र्याशी  असलेल्या संबंधावरून पूजाने आत्महत्या केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.  पूजा पहिल्या मजल्यावर राहत होती. टू-बीएचकेच्या फ्लॅटमध्ये ती राहत होती. सोसायटीच्या समोर सिमेंटचा रस्ता आहे. पहिला मजला आणि रोडचं अंतर 30 ते 32 फूट असल्याचं सांगण्यात येतं. पूजाने रविवारी 7 फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजता आत्महत्या केली. पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून तिने उडी मारून आत्महत्या केली. 30 ते 32 फूटावरून तिने उडी मारल्याने तिच्या डोक्याला मार गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

अधिक वाचा  मुल होत नाही म्हणून नवऱ्याने घातला दुसऱ्या लग्नाचा घाट : पत्नीची आत्महत्या

दरम्यान, या प्रकरणाचा गुन्हा नोंद नसल्याने पोलिसांना तपास करणे कठीण जात आहे. पूजाच्या कुटुंबीयांनी तक्रार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कोणाला ताब्यात घेऊन तपास करणे पोलिसांना शक्य होत  नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी केवळ जबाब नोंदविण्यात आले आहेत.  तपासादरम्यान पोलिसांना पूजा ज्या फ्लॅटमध्ये राहत होती. त्या फ्लॅटमध्ये चार मद्याच्या बाटल्या आढळून आल्या असून अडीच बाटल्या रिकाम्या झाल्या असल्याचे आढळून पोलिस सूत्रांनी संगीतले. त्यामुळे पूजाने मद्यप्राशन केले असावे असे सांगितले जात आहे. पूजा गॅलरीच्या कठडयावर बसली होती आणि तिने मद्य प्राशन केले होते त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात Suicide or Assassination?यादृष्टीनेही पोलिस तपास करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love