100 जीव वाचवायचे होते मला डोनेशन करुन मात्र .. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झालेल्या तरुणाची सुसाइड नोट


पुणे–महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दीड वर्ष उलटूनही नियुक्ती न झाल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या पुण्यातील फुरसूनगी भागातील तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. स्वप्नील लोणकर असे या तरुणाचे नाव असून त्याने लिहिलेल्या सुसाइड नोटमधून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एमपीएससी परीक्षा मोठ्या कष्टाने स्वप्नील उत्तीर्ण झाला होता. घरची बिकट परिस्थितीमुळे घेतलेले कर्ज परीक्षा पास झाल्यानंतर नोकरी लागली की फेडता येईल या आशेने गेली दीड वर्षे नियुक्तीची वाट पाहणाऱ्या स्वप्नीलचा  24 वय संपत आल्याने तणाव वाढला. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे त्याने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने लिहिले आहे.

अधिक वाचा  'कोरेगाव भीमा'त नीलसागर उसळणार : शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यास विक्रमी गर्दीची शक्यता

काय म्हटलंय स्वप्नीलने सुसाइड नोटमध्ये?

पासआऊट होऊन दोन वर्ष झाली आहेत. 24 वय संपत आलं आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे काहीच उरलेलं नाही. यास कोणत्याही व्यक्ती कारणीभूत नसून हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मला माफ करा, 100 जीव वाचवायचे होते, मला डोनेशन करुन मात्र आता 72 राहिले असे त्याने म्हटले आहे.

अधिक वाचा  खळबळजनक : जीवश्य कंठस्य मैत्रिणींनी केली एकाच वेळी आत्महत्या

सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आत्महत्या, कुटुंबियांचा आरोप

“सध्या महाराष्ट्रमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडे मोडलं आहे. अशा परिस्थितीत आपली कमावती मुलं हा घरच्यांसाठी आधार असतो. पण अशा काळात जर सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्ती मुली सोडून गेली तर कुटुंबीयांनी काय करायचं? सरकारच्या नाकर्तेपणामुळे आमच्या  मुलाने आत्महत्या केली आहे”, असा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love