PIFF : बिस्वजित चॅटर्जी, फरीदा जलाल, आशा काळे आणि अमर हलदीपूर यांना ‘पिफ’चे पुरस्कार जाहीर : मराठी चित्रपट स्पर्धेतील ७ चित्रपटांची घोषणा

PIFF : बिस्वजित चॅटर्जी, फरीदा जलाल, आशा काळे आणि अमर हलदीपूर यांना ‘पिफ’चे पुरस्कार जाहीर
PIFF : बिस्वजित चॅटर्जी, फरीदा जलाल, आशा काळे आणि अमर हलदीपूर यांना ‘पिफ’चे पुरस्कार जाहीर

PIFF : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (Pune International Film Festival – PIFF) अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल (Dr. Jabbar Patel) यांनी आज एका पत्रकार परिषदेत २४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची अधिकृत घोषणा केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील (Indian Cinema) अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते बिस्वजित चॅटर्जी (Biswajit Chatterjee), ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल (Farida Jalal) आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे (Asha Kale) यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’ (PIFF Distinguished Award) देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीतकार अमर हलदीपूर (Amar Haldipur) यांना ‘संगीतकार एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ (Musician S.D. Burman International Award) जाहीर करण्यात आला आहे.

अधिक वाचा  Atalparva | Kalasangam:कलासंगमातून उलगडले ‘अटल’ जीवनपैलू : विविध कलाविष्कारातून अटल बिहारी वाजपेयींना अभिनादन

पुणे फिल्म फाउंडेशन (Pune Film Foundation), सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) व दादासाहेब फाळके चित्रनगरी (Dadasaheb Phalke Chitranagari), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील १० स्क्रीनवर  पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेला डॉ. मोहन आगाशे (Dr. Mohan Agashe), सतीश आळेकर (Satish Alekar), सबिना संघवी (Sabina Sanghvi), किशोरी गद्रे (Kishori Gadre), समर नखाते (Samar Nakhate), अभिजीत रणदिवे (Abhijit Randive), विशाल शिंदे (Vishal Shinde) आणि अदिती अक्कलकोटकर (Aditi Akkalkotkar) उपस्थित होते.

महोत्सवाचे उद्घाटन  १५ जानेवारीला ई-स्क्वेअर थिएटर  येथे होईल, तर समारोप आणि पुरस्कार सोहळा  बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharva Rangmandir) येथे पार पडणार आहे. महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी  www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाली असून, प्रत्यक्ष नोंदणी ५ जानेवारीपासून सुरू होईल.

अधिक वाचा  कोरोना प्रतिबंधक लस जनतेपर्यंत पोहोचवता यावी म्हणून पूर्वतयारी सुरु- जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख

यावेळी ‘मराठी चित्रपट स्पर्धा’ (Marathi Film Competition) विभागाचीही घोषणा करण्यात आली, ज्याचे परीक्षण आंतरराष्ट्रीय ज्यूरींमार्फत  केले जाते. यातील विजेत्या चित्रपटास ५ लाख रुपयांचे ‘संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ (Sant Tukaram Best International Marathi Film) पारितोषिक दिले जाते. या स्पर्धेत रमेश मोरे यांचा ‘आदिशेष’ (Adishesh), मोहित टाकळकर यांचा ‘तो, ती आणि फुजी’ (To, Ti ani Fuji), जिजीविशा काळे यांचा ‘तिघी’ (Tighi), रवींद्र माणिक जाधव यांचा ‘जीव’ (Jeev), संतोष डावखर यांचा ‘गोंधळ’ (Gondhal), मनोज नाईकसाटम यांचा ‘गमन’ (Gaman) आणि समीर तिवारी यांचा ‘बाप्या’ (Bapya) या चित्रपटांची निवड झाली आहे. तसेच ‘मराठी सिनेमा टुडे’ (Marathi Cinema Today) विभागात सैकत बागबान यांचा ‘सोहळा’ (Sohala), परेश मोकाशी यांचा ‘मुक्कामपोस्ट बोंबीलवाडी’ (Mukkampost Bombilwadi), आदित्य इंगळे यांचा ‘माया’ (Maya) आणि नीलेश भास्कर नाईक यांचा ‘द्विधा’ (Dwidha) हे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love