पद्मशाली समाजाचा येत्या रविवारी ऑनलाइन वधू-वर परिचय मेळावा


पुणे – सोलापूर येथील श्री मार्कडेय सोशल फाउंडेशन (रजि.) संचलित पद्मशाली सप्तपदी” तर्फे महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या उपवर वधू-वरांसाठी मोफत ऑनलाईन परिचय महामेळावा रविवारी (ता. २५) आयोजित केल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी दिली.

हा मेळावा सकाळी १० ते २ पर्यंत पुन्हा संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत होईल. ऑनलाईन महामेळाव्यात घर बसल्या उपवर वधू-वरांना स्वतःची व कौटुंबिक माहिती देता येईल. पद्मशाली समाजातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामुर्ती, लक्ष्मण दौतूल, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, अंबादास गुर्रम, मधुसूदन माचरला, अंबादास आधेली, बालाजी कुंटला, नवनीत पोला यांनी केले आहे.

अधिक वाचा  उरवडे येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू: 15 महिलांचा समावेश?

इच्छुकांनी ममता मुदगुंडी (मो. ९१७५९८८९४०), संतोष कॉकलवार (मो. ९८२२४१२३६२), निता कट्टा मो. ९८२२२५५२७२), अरुण अमृतवाड, पुणे (मो. ९७६२५४३८४२), अमोल बोदल, संगमनेर (मो. ८८३०४४१५३७), रमेश दासरी, (मो. ९०२८२५७२६६), श्रीनिवास मंचेवार (मो. ९६६५१०७०७६), नाना नारायण मादास, अहमदनगर (मो. ९९२२१८७८३३ व मो. ८८३०४२७६४४) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love