गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर येतोय ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपट

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- सोलापूरमधल्या सांगोला तालुक्याचे तब्बल अकरावेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालेले आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुख यांच्या जीवन चरित्रावर ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख करीत आहेत. (The movie ‘Karmayogi Abasaheb’ is coming on the life of Ganpatrao Deshmukh)

या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी चित्रपटाचे निर्माते बाळासाहेब एरंडे व मारुती बनकर, दिग्दर्शक अल्ताफ शेख, स्टार कास्ट व उल्हास धायगुडे पाटील, कॅमेरामन आर्ट आणि कॉस्टूम डिपार्टमेंटचे सर्व सहयोगी उपस्थित होते.      

 वेडा BF, बेतुका, कम ऑन विष्णू, ब्रेक डाऊन धारावी कट्टा , असे एकाहून एक सरस चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या बहुप्रतीक्षित “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली. ह्या चित्रपटात प्रमूख भूमिका अनिकेत विश्वासराव यांची, तर सह कलाकार हर्षद जोशी, विजय पाटकर, अभिनेत्री देविका दप्तरदार, अभिनेत्री निकिता सुखदेव, सैराट फिल्म फेम अरबाज शेख, तानाजी गुलगुंडे, अहमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, प्रदीप वेलणकर, अनिल नगरकर, छोटा पुढारी वृंदा बाळ हे चंदेरी दुनियेतले तारे आपली कला दाखवतील.

प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे, तर चित्रपटातील गाणी बॉलीवूड सिंगर कुणाल गांजावाला आणि मनीष रांजणे यांनी गायली आहेत. छाया चित्रकार कुमार डोंगरे, स्टील फोटोग्राफर राजेंद्र कोरे, कस्टम डिझायनर संगीता चौरे व  पोर्णिमा मराठे, एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर अमजदखान शेख, विशेष सहकार्य उल्हास धायगुडे पाटील यांचे आहे. मायाक्का माऊली फिल्म प्रोडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट यांची आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *