अन्यथा छोटे उद्योग उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही- अभय भोर


पुणे -नेहमीचा अर्थसंकल्पात छोट्या उद्योगांच्या तोंडाला पाने पुसली जातात 2021 चा अर्थसंकल्प स्थानिक उद्योगांना विचारात घेऊनच करावा लागेल अन्यथा येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील आणि देशातील उद्योग मोठ्या प्रमाणात परराज्यात आणि परदेशात स्थलांतरीत होईल अशी भीती फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केली आहे. जीएसटी, नोटाबंदी आणि नंतर कोरोनाचे संकट आल्यामुळेच उद्योग क्षेत्रावर मोठी संकटे आली आहेत आणि आता उद्योग सावरण्यासाठी उद्योगांना खऱ्या मदतीची गरज आहे. या सर्व गोष्टींचा विचार यंदाच्या अर्थसंकल्पात केला जावा अन्यथा छोटे उद्योग  उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असेही भोर म्हणाले. जीडीपी दरात सुद्धा सुधारणा व्हावी असे वाटत असेल तर केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणीही अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.

अधिक वाचा  कृषीऐवजी कार्पोरेट कंपन्यांनाच सरकारचे ‘प्राधान्य’- अजित नवले

* फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

* महाराष्ट्रातील उद्योगांना इतर राज्यांच्या तुलनेत वीजदर पाहिजे

*उद्योगांच्या पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद पाहिजे ती सध्या दिसून येत नाही

* स्टार्टअप युवा उद्योजकांना शासकीय पुरवठा घटक म्हणून संधी दिली पाहिजे महिला उद्योगांच्या      उभारणीसाठी

* महिला उद्योग धोरणात बदल करावा आणि सबसिडी जाहीर करावी

* जीएसटी परतावा वेळेत मिळावा कारण अनेक उद्योगांचे भांडवल मोठ्या प्रमाणात अडकले जाते त्यामुळे उद्योगांवर खेळत्या भांडवलाची कमतरता दिसून येते

* दोन कोटीच्या वर ज्यांचे उत्पन्न आहे त्यांना जो अधिभार लावला जातो तो काढावा तसेच येणाऱ्या आधुनिकीकरणात इलेक्ट्रिक उद्योगांना लागणाऱ्या सुविधा तंत्र शिक्षणाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करावे जेणेकरून कामगारांचा पुरवठा प्रत्येक उद्योगाला नियमित  मिळेल आणि कामगार कमतरतेचा मोठा प्रश्न निकाली लागेल

अधिक वाचा  पुरंदर येथील विमानतळ पुन्हा चाकण येथे आणावे - फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची मागणी

* ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होण्यासाठी उद्योगांना प्राधान्याने औद्योगिक झोन निर्माण करून ग्रामीण भागात कुटीर उद्योग आणि फूड उद्योग याचे क्लस्टर उभे करावेत.

* राज्यातील प्रत्येक शहरामध्ये उद्योग मित्र कार्यालय उभारल्यास उद्योगांना लागणाऱ्या परवानग्या आणि जागा याची संपूर्ण माहिती आणि मदत मिळू शकते सरकारी योजना उद्योग पर्यंत पोहोचतच नाही हे दुर्दैव.

* सरकार अनेक योजना जाहीर करतात व अनेक निधी उद्योगांसाठी जाहीर करतात परंतु स्थानिक बँका व शासकीय बँका गरजवंत उद्योगांना त्याचा लाभ देताना दिसत नाहीत यावर चौकशी समिती नेमावी अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अभय भोर यांनी केंद्राकडे केली आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love