Culinary competition in Pune Festival completes with excitement

पुणे फेस्टिव्हलमध्ये पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये महिलांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळून देणाऱ्या महिला महोत्सवात महिलांचा पाककला स्पर्धा, दि. २५ सप्टे. रोजी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, शिवाजी नगर येथे उत्साहात पार पडल्या. महिलांच्या पाककला स्पर्धेचा यंदा २६वे वर्ष होते. दीपप्रज्वलनाने या स्पर्धांना प्रारंभ झाला. पाककला स्पर्धेत १०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. पुणे फेस्टिव्हलच्या करुणा पाटील यांनी याचे आयोजन केले होते.

पाककला स्पर्धेत 2 विभाग होते. त्यात महिला आणि हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थी असे गट होते . या स्पर्धेत ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरई/भगर, राळे यापैकी एक अथवा मिक्स भरड वापरून पदार्थ बनवायचे होते. दुसऱ्या विभागात गोड आणि तिखट पदार्थ यांचा समावेश होता. पदार्थाची चव, पौष्टिकता, नाविन्य, सादरीकरण आणि स्वच्छ्ता गृहीत धरले गेले होते. पदार्थासोबत थोडक्यात लिहिलेली पाककृती ज्यामधे वापरलेले जिन्नस आणि प्रमाणाचा उल्लेख होता. भरड धान्यापासून महिलांनी विविध देशी विदेशी नाविन्यपूर्ण पदार्थ करून मांडले होते. या वर्षी स्पर्धेत हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थी हा विभाग पहिल्यांदाच ठेवण्यात आला होता. या मधे विद्यार्थ्यांनी  केलेल्या पदार्थांमध्ये भरड धान्य वापरून बनवलेले इंटर कॉन्टिनेन्टल पदार्थ हे वैशिष्ट्य होते.

किशोर सरपोतदार, शीला अय्यर, अवंती दामले, उषा लोकरे, स्मिता शेट्टी यांनी महिला विभागातील पदार्थांचे परिक्षण केले. हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या पदार्थांचे परीक्षण शेफ जयंत पुणेकर आणि शेफ सर्वेश जाधव यांनी केले. पाककला तज्ञ मधुरा बाचल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

इन्स्टिट्युटच्या मुख्याध्यापिका डॉ. सोनाली जाधव यांचा सत्कार पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे फेस्टिवलचे  मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे, पाककला स्पर्धेच्या मार्गदर्शक अंजली वागळे, संध्या काणेगावकर, मंदा घाटे उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :

महिला गटात गोड पदार्थ विभागात –

प्रथम – विद्या ताम्हणकर,

द्वितीय – वर्षा तेलंग

तृतीय – संगीता गांधी

उत्तेजनार्थ – पुनम परमार, मयुरी दोभाडा, सीमा नलावडे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *