पुणे(प्रतिनिधी) – पुणे शहरात दिवसेंदिवस घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शहरातील दोन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये १ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले आहे
पहिल्या घटनेत शिवणे भागातील सदनिकेचा कडीकोयंडा तोडून ५४ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चंद्रकांत रोहिदास पाटील (वय ३३, रा.शिंदे पुल, शिवणे) यांनी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार पाटील हे शिवणे भागातील गजरूक्मीणी अपार्टमेंट मध्ये राहायला आहे. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बेडरूमध्ये प्रवेश केला आणि कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले ५४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
दुसर्या घटनेत कदमाक वस्तीतील घराच्या दरवाज्याची कडी तोडून १ लाख ३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सचिन बबन तांबे (वय ३९, रा. कदमवाक वस्ती) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रादार तांबे यांच्या घराच्या दरवाजाची कडी उघडून चोराने त्यांच्या आईच्या बेडरूममधील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.