Deaf 17-year-old girl raped in Pune

१७ वर्षीय कर्णबधीर मुलीवर भाऊ आणि मित्रांकडून पाच वर्षांपासून अत्याचार

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

Deaf 17-year-old girl raped in Pune — पुण्यात कर्णबधीर (Deaf) १७ वर्षीय मुलीवर तिच्याच भाऊ आणि मित्रांनी वारंवार बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्णबधीर ( Deaf) मुलीने शाळेतील शिक्षिकेकडे (School Teacher) याबाबत तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhva Police ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A 17-year-old deaf girl was abused by her brother and friends for five years)

याप्रकरणी एका कर्णबधीर शाळेच्या शिक्षिकेने पोलिसांत तक्रार दिली आहे. शिक्षिकेच्या तक्रारीनंतर दोन तरूणांसह तिच्या भावाविरुद्ध बलात्कार (Rape), पॉक्सो(Pocso), विनयभंग (molestation)आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात सागर रजाने (वय ३०, रा. उंड्री, कोंढवा) (Sagar Rajane), राहुल पाटील (वय २३) (Rahul Patil) यांच्यासह तिच्या भावाविरोधात एका कर्णबधिर शाळेच्या शिक्षिकेने तक्रार दिली आहे. हा प्रकार २०१८ पासून २०२३ पर्यंत सुरू होता.

राहुल पाटील हा तिचा मित्र आहे. तर, अल्पवयीन मुलगा तिच्या जवळच्या नात्यातील आहे. सागरने तिच्या घरी येऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला मारहाण केली आणि कोणाला काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच, राहुलने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. तर तिच्या नात्यातील १४ वर्षीय मुलाने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत जबरदस्तीने अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही पीडित मुलगी आणि तिचा मित्र बोलत असताना तिला शिक्षकांनी पाहिले. तिच्याकडे विचारणा केली असता हा सर्व प्रकार समोर आला आहे.

सागरने तिला मारहाण करीत कोणाला काही सांगितले, तर मारून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच, आरोपी राहुल याने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा सगळा प्रकार अखेर पीडित तरुणीने तिच्या शाळेतील शिक्षक यांना सांगितल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *