रिक्षाचालकाकडून विद्यार्थिनींचा पाठलाग करत विनयभंग

रिक्षाचालकाकडून विद्यार्थिनींचा पाठलाग करत विनयभंग
रिक्षाचालकाकडून विद्यार्थिनींचा पाठलाग करत विनयभंग

पुणे(प्रतिनिधी) -शाळेत जाणार्‍या अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत रिक्षाचालकाने विनयभंग केल्याचे प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी १५ वर्षीय पिडीत मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रिक्षा चालक फैजल वहाब अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या मैत्रिणींसोबत सोमवारी (दि. २३ सप्टेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास ससाणेनगर, हडपसर परिसरातून शाळेत जात होती. त्यावेळी आरोपी रिक्षा चालक फैजल अन्यारी हा मुलींचा पाठलाग करत होता. यावेळी फैजलनेे त्याचा मोबाईल क्रमांक लिहलेली एक चिठ्ठी मुलींसमोर टाकून फोन करण्याचा ईशारा केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रविण अब्दागिरे हे करत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  खळबळजनक : जीवश्य कंठस्य मैत्रिणींनी केली एकाच वेळी आत्महत्या