स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन


पुणे – स्किझोफ्रेनिया  अवेअरनेस असोसिएशन (सा), या मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती व त्यांच्या  पालकांसाठी  काम  करणाऱ्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या रविवारी, ११ डिसेंबर रोजी विधी महाविद्यालय रस्ता येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी  ५ या वेळेत होणार आहे. महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, पूर्वनोंदणी आवश्यक असणार आहे.

महोत्सवात पहिल्या सत्रात मानसिक आजार व आरोग्य या विषयावरील ११ लघुपट दाखवण्यात येणार असून,दुसऱ्या सत्रात  ‘सा’  निर्मित ‘देवराई’ या राष्टीय पारितोषिक विजेत्या चित्रपटाचे विशेष  प्रसारण  करण्यात येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन ११ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता होणार असून, यावेळी मानसोपचार तज्ज्ञ व अभिनेते  डॉ. मोहन आगाशे, चित्रपट निर्माते सुनिल सुकथनकर, निर्माते मकरंद शिंदे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक कृष्ण कुमार गोयल आणि लोकसत्ता वृत्तपत्राचे संपादक मुकुंद संगोराम यांची प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया  देसाई करतील.

अधिक वाचा  सोनालिकाने जानेवारी २०२३मध्ये ९,७४१ ट्रॅक्टरची केली विक्रमी नोंद 

संस्थेबाबत माहिती देताना अध्यक्ष अभय केले म्हणले, “ ‘सा’ चे  संस्थापक अध्यक्ष डॉ. जगन्नाथ वाणी हे स्वतः आपल्या पत्नीचे काळजीवाहक होते, त्यामुळे मानसिक आजारी व्यक्ती व कुटुंबीय यांना कोणत्या क्लेशकारक  प्रसंगातून जावे लागते याचा त्यांना अनुभव होता, त्यामुळे त्यांनी संस्थेची स्थापना केली. ‘सा ‘ ही संस्था मानसिक आजारी व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्र चालवते. याशिवाय मानसिक आजारी व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी स्व- मदत गट चालवते.  ‘मेंटल हेल्थ केअर कायदा २०१७’ यामध्येही संस्थेचे योगदान आहे. संस्थेला १८ डिसेंबर २०२२ रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. मानसिक आरोग्य या विषयावर जनजागृती करण्याच्या निमित्ताने आम्ही या चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे.’’

महोत्सवासाठी ९८३४८९९३८३ या क्रमांकावर व्हाटस अॅपद्वारे पूर्वनोंदणी करता येईल.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love