राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण : बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ यांच्यासह 21 जणांवर गुन्हा


पुणे–पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवारी गोळीबार झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. आमदार बनसोडे यांच्यावर ज्यांनी गोळीबार केल्याचे सांगितले जात होते त्या तानाजी पवार  यांनाच आमदार बनसोडे यांनी धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल  झाली आहे तर पवार ज्या कंपनीत नोकरी करतात त्या अँथोनी कंपनीच्या कामगारांना आमदार बनसोडे यांचे चिरंजीव मारहाण करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याने आमदार बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह 21 जणांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. त्यामुळे आता आमदार बनसोडे आणि त्यांचे पुत्र सिद्धार्थ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आमदार बनसोडे यांनी गोळीबार केल्याचा दावा खरा की खोटा अशी चर्चा सुरू झाली आहे. कथित गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला. झाडलेल्या दोन्ही गोळ्यांमधून आमदार सुखरुप बचावले. घटनास्थळी 20 ते 20 कार्यकर्ते उपस्थित होते, त्यापैकी कोणीही जखमी नाही. पालिकेचे कंत्राटदार सिजू अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. “मी स्वतः तानाजीला बोलाऊन घेतलं होतं, त्यानंतर त्याने एकेरी उल्लेख केला, त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला आणि त्याने माझ्या दिशेने गोळीबार केला, सुदैवाने मी यातून बचावलो,” असं आमदार बनसोडे यांनी पोलिसांना सांगितलं.

अधिक वाचा  अन्यथा छोटे उद्योग उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही- अभय भोर

तानाजी हे सीआरपीएफचे निवृत्त जवान असल्याचंही समोर आलं. मग पत्रकार घटनास्थळी पोहोचले आणि कॅमेऱ्यासमोर वरील घटनाक्रम सांगितला. राज्यातील सत्ताधारी आमदारांवर गोळीबार म्हणजे धक्कादायक घटना, बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी तातडीने तानाजीला अटक केली. पण गोळी ना आमदारांना, ना उपस्थितांना लागली मग गोळीची खूण शोधण्याचं काम सुरु झालं. पण काही केल्या पोलिसांना ती खूण सापडत नव्हती.

आमदार बनसोडे आणि तानाजी पवार यांच्यामधील 11 मे रोजी फोनवरुन झालेल्या संवादाची क्लिप समोर आली. यात आमदार शिवीगाळ करुन तानाजीला धमकावत आहेत. तानाजी मात्र आपण योग्य भाषा वापरावी, असं अनेकदा सांगत होता. परंतु  संतापलेल्या आमदारांनी तू उद्या ये मग बघू, असं त्यात धमकावले. एक मिनिट चाळीस सेकंदाची ही संपूर्ण ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार अण्णा बनसोडे आणि पवार यांचे फोनवरून संभाषण झाले. त्यावेळी ते आमदारांना उलटे बोलले, असा आरोपींचा समज झाला. पवार बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या आकुर्डी येथील कार्यालयात होते. त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आमदार अण्णा बनसोडे यांच्या दोन साथीदारांनी पवार यांचे अपहरण करून काळभोर नगर, चिंचवड येथे नेले. तेथे आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यासह इतर आरोपींनी त्यांनी लाथाबुक्क्यांनी, चामडी पट्ट्याने, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सिद्धार्थ बनसोडे याने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून जिवे ठार माण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) तसेच इतर १० ते १५ इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १३) फिर्याद दिली आहे.

अधिक वाचा  सासरवाडीच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

दुसऱ्या प्रकरणात स्वाती सचिन कदम (वय ३९, रा. गंगानगर, फुरसुंगी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १२) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ बनसोडे यांचे पीए व इतर आठ इसम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम या एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लि. या कंपनीत नोकरीला आहेत. कंपनीच्या आकुर्डी येथील कार्यालयात मंगळवारी (दि. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या कामावर असताना दोन चारचाकी वाहनातून व एका दुचाकीवरून आरोपी तेथे आले. कंपनीच्या पॅन्ट्रीमध्ये जबरदस्ती घुसून धनराज बोडसे व अमोल कुचेकर यांना मारहाण केली. तसेच कार्यालयाबाहेर जमाव केला. कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, अशी विचारणा आरोपींनी केली. तानाजी पवार हे कोठे आहेत, हे आम्हाला माहीत नाही, असे आरोपींना सांगितले असता त्यांनी फिर्यादीच्या कंपनीचे आयटी एक्झीक्यूटीव विनोद रेड्डी यांना डोक्यावर लोखंडी टॉमीसारख्या घातक शस्त्राने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कामगार गोकर्ण चव्हण यांना ढकलून देऊन जखमी केले. त्यानंतर ऑफिस जबरदस्तीने बंद करण्यास सांगून कदम व तानाजी पवार यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले.

अधिक वाचा  शिव छत्रपतींचे जन्मस्थान शिवनेरी हे राष्ट्रीय स्मारक व्हावे : गोपाळदादा तिवारी यांची मागणी

दरम्यान, आमदार बनसोडे यांच्या दिशेने गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावनकुमार रमेश सलादल्लू (वय ४८, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. १३) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी प्राधिकरण), संकेत शशिकांत जगताप व श्रीनिवास बिरादार (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love