कोण होणार करोडपती मध्ये कर्मवीर या विशेष भागात खेळणार नाना पाटेकर


पुणे- सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे . या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत आहे . संपूर्ण महाराष्ट्रातून कोण होणार करोडपातील चांगला प्रतिसाद मिळत आहे , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत . हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकांशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक अर्थबळ देत आहेत. कोण होणार करोडपती मध्ये आठवड्यातून १ दिवस कर्मवीर विशेष भाग असतो . पहिल्याच आठवड्यात शनिवारी १७ जुलैच्या भागात अभिनेते नाना पाटेकर कर्मवीर म्हणून येणार आहेत.

नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला आहे . कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत . नाना पाटेकर यांनी सैनिकी शिक्षण घेतले असून ते कारगिल युद्धात देखील सहभागी होते . त्यांनी आपले कारगिल युद्धातील काही अनुभव सांगितले  नानां च्या वडिलांबद्दल नाना कधीही फार व्यक्त होत नाहीत पण खेडेकरांनी या मुद्द्याला हात घालून नानां ना बोलते केले आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना भावुक झाले अनेक किस्से , कविता , बालपणीच्या आठवणी , शेतावरच्या गप्पा असे नानांचे अनेक पैलू या मंचावर उलगडणार आहेत .

अधिक वाचा  कोण होणार करोडपतीच्या मंचावर काजोल आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची विशेष उपस्थिती

कर्मवीर या भागात स्पर्धक येऊन समाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून त्यांना देऊ करतात आता नाना नेमका कोणासाठी खेळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे . पहिल्या कर्मवीर भागात नाना पाटेकर आले आहेत तर या पर्वत पुढे आणखी कोणते कर्मवीर पाहल्याला मिळतीन याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

घरबसल्या लखपती होण्याची संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे . कोण होणार करोडपती टीव्ही वर  पाहता पाहता प्रेक्षक खेळू शकतात . कोण होणार करोडपती प्ले अलॉंग’!आणि जिंकू शकतात १ लाख रु. आणि हॉटसीटवर येण्याची संधी पाहायला  विसरू नका कोण होणार करोडपती कर्मवीर विशेष भाग  येत्या शनिवारी १७ जुलै रोजी फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love