#हीट अँड रन’ प्रकरण : अग्रवाल कुटुंबियांविरोधात आणखी एक तक्रार दाखल होणार : ८४ लाख रुपये न दिल्याने मुलाची आत्महत्या : तक्रारदाराचा आरोप

Judicial custody of Vishal Agarwal and grandfather Surendra Agarwal
Judicial custody of Vishal Agarwal and grandfather Surendra Agarwal

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक गोष्टी समोर येत असतानाच आता या प्रकरणातील आरोपी अग्रवाल कुटुंबियांविरोधात आणखी एक आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दत्तात्रय कातोरे हे अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल करणार आहेत. आपल्या मुलाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारदार दत्तात्रय कातोरे यांनी केला आहे. यापूर्वी शिवसेना नेते अजय भोसले यांनी पुढे येत अग्रवाल कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती

दत्तात्रय कातोरे पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार आहेत. तक्रारदार कातोरे अग्रवाल यांच्या ब्रम्हा बिल्डर्स कंपनीकडे २००० ते २००५ दरम्यान खोदाईचं काम करत होते. काम पूर्ण झाल्यानंतरही कातोरेंना अग्रवाल बिल्डर्सकडून पैसे देण्यात आले नव्हते. कातोरेंना अग्रवालांकडून तब्बल ८४ लाख ५० हजार रुपयांचं येणं होतं. सातत्यानं पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्यामुळे तक्रारदार दत्तात्रय कातोरेंचा मुलगा शशी कातोरे यानं जानेवारी महिन्यात आत्महत्या केली. याप्रकरणी आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडील दत्तात्रय कातोरे पोलिसाकडे आज तक्रार दाखल करणार आहेत.

अधिक वाचा  'रंग बरसे' मध्ये न्हाऊन निघाली विशेष मुले : भोई प्रतिष्ठानचा विशेष मुलांसाठी रंग महोत्सव

दरम्यान, पुणे पोलिसांच्या अहवालानुसार, अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आतापर्यंत दोन तक्रारदार पुढे आले आहेत. यापूर्वी शिवसेना नेते अजय भोसले यांनी पहिली तक्रार दाखल केली होती. अजय भोसले यांनी तक्रार केल्यानंतर अग्रवाल बिल्डर्सचं अंडरवर्ड कनेक्शनही समोर आलं होतं.

अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन

ब्रह्मा बिल्डर्सच्या नावानं या अगरवाल कुटुंबांचा धंदा असला, तरी ते काळ्या कृत्यांमध्ये सहभागी असल्याचं आता समोर आलं आहे. विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचं त्यांच्या भावासोबत पटत नव्हतं. संपत्तीचा वाद होता. तेव्हा त्यांनी थेट छोटा राजनशी संपर्क साधला होता. त्यांचा उद्देश त्यावेळी साध्य झाला नाही, पण छोटा राजनबरोबर दोस्ती वाढली. छोटा राजनचा हस्तक विजय पुरुषोत्तम साळवी ऊर्फ विजय तांबटची बँकॉकला जाऊन भेटही घेतली होती. या दोस्तीतूनच सुरेंद्र अग्रवाल यांनी २००९ साली शिवसेना नेते अजय भोसलेंची सुपारी दिली होती. वडगाव शेरीत २००९ ची निवडणूक लढवताना भोसलेंवर गोळीबारही झाला होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love