मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरेंची तोफ धडाडणार

Muralidhar Mohol will fire Raj Thackeray's cannon for this
Muralidhar Mohol will fire Raj Thackeray's cannon for this

पुणे(प्रतिनिधि)- पुणे लोकसभा मतदार संघातील महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. येत्या १० तारखेला राज ठाकरेंची सभा होईल. पुण्यात अलका टॉकीज चौकात (टिळक चौक) राज ठाकरेंची सभा होण्याची शक्यता आहे. कणकवलीनंतर राज ठाकरेंची तोफ मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी धडाडणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीएम नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा दिला. त्यानंतर भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांनी राज ठाकरेंना सभेसाठी विनंती केली होती. राज ठाकरे यांनी नारायण राणेंचा विनंतीला मान देत कणकवली येथे सभा घेतली. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत राज ठाकरेंनी नारायण राणेंना निवडून देण्याचे आवाहन केले. दरम्यान, राज ठाकरे आता भाजपसाठी सभांचा धडाका लावणार आहेत. पुण्यातही राज ठाकरेंची सभा होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  महापालिका व स्मार्ट सिटीची निकृष्ट व अर्धवट कामे पाहण्यासाठी पिंपळे गुरवचा दौरा करावा :शामभाऊ जगताप यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने पुण्याचे माजी महापौर असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवले आहे. शिवाय, पुण्यात राज ठाकरेंची साथ सोडत वंचितकडून उमेदवारी मिळवलेले वसंत मोरेही रिंगणात आहेत. अशातच मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love