धंगेकर यांनी आमदार झाल्यानंतर मुस्लिम वक्फ बोर्डाची मालमत्ता लाटल्याचा एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांचा आरोप : राजकीय वर्तुळात खळबळ

Allegation that Dhangekar stole property of Muslim Waqf Board after becoming an MLA
Allegation that Dhangekar stole property of Muslim Waqf Board after becoming an MLA

पुणे(प्रतिनिधि)—पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. सुरुवातीला महायूती आणि महाविकास आघाडी यांच्यातच लढत होणार असे चित्र असताना वंचित बहुजन विकास आघाडीने आणि त्यानंतर एमआयएमने रिंगणात उडी घेतली आहे. दरम्यान, एमआयएमचे अनिस सुंडके यांनी निवडून आल्यास टिपू सुलतान यांच स्मारक उभारण्याची घोषणा केली त्यावरून वाद निर्माण झाला आहे तर सोमवारी त्यांनी थेट महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. मुस्लिम वक्फ बोर्डाची मालमत्ता धंगेकर यांनी लाटल्याचा आरोप करून सुंडके यांनी खळबळ उडवून दिली आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला आहे. रविवार पेठेत लक्ष्मी रस्त्याजवळ सर्व्हे नंबर 966 हा तब्बल 1 हजार 607 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारा भूखंड वक्फ बोर्डाची मालमता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तो भाडेकराराने देण्यात आला. सन 1947 नंतर कायद्‌याचा अंग करून वक्फ बोर्डाची ही मालमत्ता बँकेकडे गहाण टाकण्यात आली. बँकेने परस्पर त्याचा लिलाव केला. त्यानंतर गेल्यावर्षीच्या (2023) मार्पच-एप्रिल महिन्यात हा मोक्याचा भूखंड उत्कर्ष असोसिएशनतर्फे भागीदार वृषाली रावसाहेब शेंडगे, प्रतिभा रविंद्र धंगेकर, प्रतिक सुनिल अहीर यांच्या नावे करण्यात आल्याच सुंडके यांनी सांगितलं आहे.

अधिक वाचा  लोकशाहीसाठी सांविधानिक नैतिकता महत्वाची- लक्ष्मीकांत देशमुख

मुस्लिम वक्फ बोर्डाची ही मालमता काँग्रेसचे पुणे लोकसभा उमेदवार आणि आमदार रविंद्र धंगेकर यांनी शहर महापालिकेतील अधिकाऱ्यांना हताशी धरून संगनमताने बळकावली असल्याचा आरोप एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी केला आहे. धंगेकरांनी हा भूखंड त्यांच्या पत्नीच्या नावावर घेतला असून आता खासगी विकसक उत्कर्ष असोसिएट्‌सच्या मदतीने त्या ठिकाणी निवासी- व्यावसायिक इमारत बांधली जात असल्याचा आरोपही सुंडके यांनी केला आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकल्यानंतरच धंगेकरांच्या पत्नी आणि उत्कर्ष असोसिएट्स यांनी हा व्यवहार पूर्ण केला, असा आरोपही सुंडके यांनी केला आहे.

लक्ष्मी रस्त्यावर मोक्याच्या जागी असणाऱ्या या मालमत्तेची बाजारभावाने आजची किंमत करोडो रुपयांच्या घरात आहे. या व्यवहारामुळे मुस्लिम समाजाच्या श्रद्धा दुखावल्या गेल्या आहेत. वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणजे सर्वशक्तीमान अल्लाची देन असते. गरीब, मागास मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी ही मालमत्ता वापरायची असते. मात्र पुण्यासारख्या ठिकाणी काँग्रेसच्या आमदारांनीच वक्फ बोर्डाचा अमूल्य भूखंड बड्या महापालिका अधिकाऱ्याशी संगनमत करून बळकावला आहे. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद आहे. त्यामुळे शासनाने या व्यवहाराची काटेकोर चौकशी करून वक्फ बोर्डाची मालमता परत करायला हवी, अशी मागणी देखील सुंडके यांनी केली आहे.

अधिक वाचा  पुणे मनपातील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली अंशदायी सहाय्य योजना प्रशासनाने मोडीत काढू नये - गोपाळदादा तिवारी

दरम्यान, अनिस सुंडके यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याने राजकीय वर्तुळात याबद्दलची चर्चा चांगलीच रंगली आहे. एका बाजूला मुस्लिम समाज हा काँग्रेसच्या बाजूने राहील, असा दावा नेत्यांकडून केला जातोय. तर दुसरीकडे पक्षाचे उमेदवार धंगेकर यांनी मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या वफ्फ बोर्डाची जमीन लाटल्याचा आरोप झाल्याने त्यांची अडचण वाढताना दिसत आहे. आता रवींद्र धंगेकर या आरोपांना काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love