पकडले दुचाकी चोर म्हणून, निघाले एनआयएच्या रडारवरील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी

दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे —पुणे शहरातील  वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग (Petroling) करत असताना पोलिसांनी पाठलाग करून पकडलेले दुचाकी चोर हे राजस्थानमध्ये (rajsthan) एनआयएच्या (NIA) रडारवर असलेले मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून एक जण फरार झाला आहे. दरम्यान, राजस्थान येथील चितोडगड (Chitodgad) येथील बॉम्बस्फोटातील (Bomb blast) हे प्रमुख आरोपी असून एनआयए गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्या शोधात होती. एनआयने त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीस लावले आहे. दरम्यान, ही कामगिरी करणारे  कोथरूड पोलीस ठाण्यातील प्रदीप चव्हाण (Pradeep Chvan) आणि पोलीस अंमलदार अमोल नझन (Amol Nazan) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Most wanted terrorists caught on NIA’s radar)

अधिक वाचा  Sanjay Raut| EVM: ईव्हीएम नसेल तर भाजप  ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही - संजय राऊत

मोहमद युनुस साकी (Mohamand Yunus Saki) व इम्रान खान (Imran Khan) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कोथरूड पोलिस स्टेशन बीट मार्शल पेट्रोलिंग पथकातील पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि पोलीस अमलदार अमोल नझन गस्तीवर होते. गस्त घालत असताना त्यांना तिघे जण दुचाकी चोरताना आढळले. त्यानंतर या दोघांनी त्यांना पाठलाग करत मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या चोरानी आजवर चोरी केलेला मुद्देमाल मिळवण्यासाठी या तीन आरोपीना ते राहत असलेल्या ठिकाणी नेण्यात आले. त्यावेळी तिन्ही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. एक आरोपी पळून जाण्यात सफल झाला तर २ आरोपी नामे इम्रान खान  आणि मोहमद यूनुस साकी यांना पकड़ण्यात पुलिसांना यश आले आहे. दरम्यान, दोघांची चौकशी त्यांनी केली. यावेळी त्यांची नावे विचारले असतांना त्यांनी हिंदू नावे सांगितली. दरम्यान,  ट्रु कॉलरवर त्यांची नावे तपासली असता त्यांची नावे ही मोहमद युनूस साकी व इम्रान खान असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बाळवल्याने त्यांनी ही बाब वारिष्ट अधिकाऱ्यांना दिली. हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरोपींच्या घरी जात तपासणी केली. या ठिकाणी पोलिसांना बंदूकीची एक गोळी आणि पिस्तूलाच कव्हर , एक कुऱ्हाड ४ मोबाइल आणि लॅपटॅाप सापडले. आणखी चौकशी केल्यावर लॅपटॅाप तपासल्यावर प्रत्येक फाईलला लॅाक असल्याच पोलिसांना लक्षात आले. एक्सपर्टच्या मदतीने हे लॅाक उघडल्यावर त्यात इस्लामिक साहित्य सापडले. पोलिसांनी एटीएसच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. त्यांनी देखील तपासची सूत्रे फिरवली. यात हे दोघे राजस्थानात मोस्ट वॉन्टेड असल्याची माहिती मिळाली.

अधिक वाचा  #Pankaja Munde On Murlidhar Mohol: पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील - पंकजा मुंडे

आरोपींकडून जप्त केलेला मोबाइल, लॅपटॉप यांची तपासणी सुरू केली आहे. तर एनआयए आणि इतर यंत्रणा देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. मार्च २०२२ मध्ये राजस्थानच्या चितोडगड मध्ये पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते आणि त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. तिघांकडून बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी पावडर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. हे प्रकरण नंतर एनआयएकडे पुढील तपासासाठी देण्यात आले आणि तपासा दरम्यान युनूस साकी आणि इम्रान खान या दोघांचे नाव समोर आले. हे दोघेही आरोपी तेव्हापासून फरार होते. त्यांना पडकण्यासाठी एनआयने प्रत्येकी ५ लाखाचं बक्षीस देखील जाहीर केले होते. हे दोघे पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते.

NIA | Most Wanted Terrorist | Rajasthan | Chitodgad| Bomb blast |

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love