चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे 20 लाख खंडणीची मागणी: महिला शिक्षिकेसह तिघांना अटक

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे—पुण्यातील सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी चितळे बंधू मिठाईवाले यांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आणि पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देत वीएस लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. विशेष म्हणजे तिघेही एकाच कुटुंबातील असून यातील महिला ही एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे.

novelty and best selling clothing

 पुनम सुनिल परदेशी (वय 27), करण सुनिल परदेशी (वय 22) आणि सुनील बेनी परदेशी (वय 49) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी चितळे डेअरीचे सहाय्यक मार्केटिंग व्यवस्थापक नामदेव बाबुराव पवार (वय 62) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पूनम परदेशी हिने 2 जून रोजी चितळे बंधू मिठाईवाले यांचा ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे ई-मेलद्वारे प्रत्यक्ष आणि फोनद्वारे तक्रार दिली होती. तुमच्या दुधात काळा रंगाचा पदार्थ आढळला आहे. तुमच्या विरोधात एफडीए व पोलिसांकडे तक्रार करते. हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा, नाहीतर तुमचे दुकान बंद करू, तुमची बदनामी करू अशा धमक्या देत तिने पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर तिने वीस लाख रुपये खंडणीची मागणी केली होती.

या सर्व प्रकारानंतर चितळे डेअरीचे प्रतिनिधी नामदेव पवार यांनी पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करून आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. दोन हजाराच्या बनावट नोटा असलेले वीस लाख रुपयाचे बंडल पोलिसांनी फिर्यादीजवळ दिले. आणि हे पैसे स्वीकारताना वरील तिन्ही आरोपींना रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांचा आणखी एक साथीदार अक्षय मनोज कार्तिक याला देखील मुंढवा येथून ताब्यात घेतले. यातील आरोपी पुनम परदेशी या पुण्यातील एका नामांकित शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. तर सुनील परदेशी आणि करण परदेशी यांचा लॉंड्रीचा व्यवसाय आहे. यातील सुनील परदेशी, करण परदेशी आणि अक्षय कार्तिक यांच्याविरोधात यापूर्वीदेखील गुन्हे दाखल आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *