पुणे – ‘तब्बल साडेतीन वर्षांच्या ऊशीराने का होईना, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १५ ॲागस्ट २०२२ ला लॉंच होणारी केंद्राच्या अखत्यारीतली बीएसएनएल-४ जी सेवा मात्र, अद्याप खाजगी कंपन्यांच्या दबावाखाली बंदच आहे. काँग्रेस पक्ष या फसव्या घोषणेचा निषेध करत असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करताना मोदी सरकारने आत्मनिर्भरतेचे कथित ढोल पिटत, देशातील जनतेस मुर्ख बनविले आहे. एकीकडे आत्मनिर्भरतेचे ढोल पिटवायचे आणि दुसरीकडके कृती मात्र आत्मनिर्भरतेच्या विरुध्द करायची हे वारंवार सिध्द झाले आहे, अशी टीकाही तिवारी यांनी केली आहे. .
दरम्यान, बीएसएनएल ४ जी सेवा सुरू व्हावी याकरीता, ‘राजीव गांधी स्मारक समिती’ तर्फे पुणे टेलिफोन भवन, ‘धरणे आंदोलन’ करण्यात आले.
तत्कालीन केंद्रीय प्रसारण मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी विशेष कँबिनेट मिटींग बोलावून, २३ आक्टो २०१९ रोज़ी, बीएसएनएल’च्या ४जी सेवेकरीता ७०,००० कोटी’चे पँकेज जाहीर केल्याची ‘निवडणुक पुर्व घोषणा’ मोदी सरकारने केली होती. मात्र बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात.. या म्हणीप्रमाणे आजतागायत, ऊद्योगपतींच्या दबावाखाली केंद्र सरकारच्या मालकीची “बीएसएनएल-४जी सेवा” ग्राहकांना उपलब्ध करू ‘न-देणारे’ केंद्र सरकार हे कर्मदरीद्री असुन, जाणीवपूर्वक बीएसएनएल या ऊत्कृष्ट सेवा देणारी, ‘नफ्यातील सरकारी कंपनी’ बंद पाडण्याच्या निंद्य हालचाली चालू असल्याचा आरोप देखील काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
बीएसएनएलचे इन्फ्रास्ट्रक्चर व टॉवर्सचा तांत्रिक आधार घेत खाजगी टेलीकॉम कंपन्या ४जी कधीच देऊ लागल्यात व आता ५ जी’ ची तयारी होत आहे. आपले भाषणजीवी पंतप्रधान त्याची अमृत महोत्सवात वाच्यता करतात. मात्र ,सरकारी बीएसएनएल अद्याप ही ४जी देऊ शकत नाही याचे त्यांना काहीच वाटत नाही. मोदींच्या डिमोनिटायझेशन पाईपलाइन स्कीम मध्ये १४,५०० टॅावर्स खाजगी कंपन्यांना देण्याचा घाट देखील मोदी सरकारने घातला आहे. तर मग “बीएसएनएल च्या कथित पॅकेज’च्या व ४जी च्या दिशाभूल करणाऱ्या घोषणा का करता? करून निव्वळ जनतेस मुर्ख बनवण्याचे कार्य मोदी सरकार करत असल्याची उपरोधिक टिका देखील काँगस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.