पुणे-शिवसेना (shivsena) आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये (ncp) फुट पडल्यानंतर महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष कॉँग्रेस (Congress) अग्रस्थानी आला आहे. राज्यातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर आता विरोधीपक्ष नेते पदावर(Opposition Leader) कॉँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे या पदासाठी कॉँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते पदी आपली वर्णी लागावी यासाठी कॉँग्रेसच्या विविध नेत्यांची नावे चर्चेत असताना भोरचे कॉँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे(Sangram Thopate) यांनी विरोधीपक्षनेते पदासाठी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी करत पक्ष श्रेष्ठींना (High Command) ३० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र पाठविले आहे. (Maharashtra Politics Crisis)
राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ अधिक झाले आहे. काँग्रेसचे ४५ आमदार असल्याने विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाणार आहे. या पदासाठी सुरूवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची नावे चर्चेत होती. मात्र, ही नावे मागे पडली. त्यानंतर यशोमती ठाकूर,(Yashomati Thakur) विजय वड्डेटीवार( Vijay Vaddetivar) आणि सुनील केदार (Sunil Kedar) या दुसऱ्या फळीतील नेत्यांची नावे पुढे आली आहेत.
याच दरम्यान, आ. संग्राम थोपटे यांनी विरोधी पक्षनेता होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी काँग्रेस हायकमांडला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यावर ३० आमदारांच्या सह्या आहेत. या आमदारांनी थोपटेंना पाठिंबा दर्शवला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना संग्राम थोपटे यांना मंत्रीपद निश्चित झाले असताना ऐनवेळी त्यांचे नाव यादीतून गाळले गेले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाचा कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिला. थोपटे यांची विधानसभा अध्यक्षपदावरची संधीही हुकली. त्यामुळे आता त्यांनी कॉँग्रेसकडे चालून आलेल्या विरोधी पक्षनेते पदावर वर्णी लागण्याची इच्छा पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी कॉँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्रही पाठवले आहे. त्यापत्रांमध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले असताना अजित पवारांनी त्याला विरोध केला असल्याचे म्हटले आहे तसेच अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर संगनमत केल्याचे म्हटले आहे.
“अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाहीत. पश्चिम महाराष्ट्र, पुणे जिल्ह्यातील राजकारण लक्षात घेऊन या संधीचा फायदा घेऊ शकतो. पुणे जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती सुधारण्यासाठी काँग्रेस पक्षाला मजबूत करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभं करू शकतो”, असा विश्वास त्यांनी या पत्रात व्यक्त केला आहे. तसेच “चार महिन्यांपूर्वी पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यावेळी मी मुख्य निरीक्षक होतो. मी मतदारांशी पक्षाला जोडण्याचं काम केलं. काँग्रेसच्या उमेदवार जिंकून येईल, यासाठी काम केले”, असंही थोपटे यांनी म्हटलं आहे.
Opposition Leader | Sangram Thopate | Congress |