जबरदस्तीने वेशा व्यवसायास भाग पाडलेली अल्पवयीन मुलगी गर्भवती; बाळालाही दिला जन्म

Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up
Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up

पुणे –आई- वडील नसलेल्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले आणि त्यातून ही मुलगी गर्भवती राहून तिने येथील ससून रुग्णालयात बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तक्रारीवरून तृतीयपंथी महादेव उर्फ भारती काळे, माया महादेव उर्फ आरती काळे यांच्यासह तीन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोहगाव विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.

गर्भवती राहिल्यानंतर प्रसूतीसाठी ससून रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मुलीच्या वयाबाबत शंका निर्माण झाल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलीच्या आई-वडिलांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यामुळे ती ओळखीच्या एका महिलेकडे लोहगाव परिसरात राहते. या ठिकाणी राहत असताना तिची धानोरी परिसरात राहणाऱ्या वरील आरोपींची ओळख झाली. आरोपींनी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत चंदननगर परिसरातील एका लॉजवर घेऊन जात तिच्याकडून वारंवार वेश्याव्यवसाय करून घेतला. या प्रकारातून ही मुलगी गर्भवती राहिली. तिला ससून रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. 9 जानेवारीला तिने एका बाळाला जन्म दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  महेश मांजरेकर यांना ३५ कोटींच्या खंडणीसाठी धमकी