MHADA presents 'Eden Garden' home project equipped with comfortable and modern facilities

म्हाडातर्फे आरामदायी व आधुनिक सुविधांनी सज्ज ‘ ईडन गार्डन’ गृहप्रकल्प सादर

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- आपलं स्वतःचे हक्काचे घर असावे, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असते. सामान्य माणसाचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने पुणे पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा) (Mhada) तर्फे बंगळुरू – मुंबई महामार्गाला लागूनच ताथवडे येथे ईडन गार्डन (‘Eden Garden’) हा गृह व व्यावसायिक प्रकल्प सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही ग्राहकांना घरांचा ताबा देण्यात आलेला असून उर्वरित घरे ‘रेडी टू मूव्ह’ आहेत. घरखरेदीसाठी इच्छुक ग्राहकांनी वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पातील घरांचा लाभ घ्यावा असे आवाहन म्हाडा तर्फे करण्यात आले आहे. (MHADA presents ‘Eden Garden’ home project equipped with comfortable and modern facilities)

भव्य व मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या गृह प्रकल्पांत 851 चौरस फुटाच्या 2 BHK च्या आणि 1702 चौरस फुटाच्या 4 BHK च्या सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्यामध्ये भरपूर नैसर्गिक प्रकाश व खेळती हवा, मोठा लॉबी एरिया आणि हॉल आणि बेडरूमला लागून असलेल्या स्पेसिअस बाल्कनीचा समावेश आहे. या प्रकल्पात २२ मजली चार टॉवर्स असून निवासी सदनिकेची किंमत ६८ लाखांपासून सुरू होते आहे. विशेष इथे कोणतेही फ्लोअर राईज चार्जेस नसून सदनिकेच्या याच किंमतीतच चार चाकी पार्किंग देखील समाविष्ट आहे.

या प्रकल्पापासून ग्राहकांना व त्यांच्या कुटुंबियांना हव्या असलेल्या बाजारपेठ, शाळा, हॉस्पीटल व जीवनाश्यक सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर आहेत. तर ईडन गार्डन प्रकल्पापासून भूमकर चौक सहा मिनिटे हिंजवडी आयटी पार्क पंधरा मिनिटे, आकुर्डी रेल्वे स्टेशन पंधरा मिनिटे, कोर्टयार्ड मॅरिएट हॉटेल सोळा मिनिटे, बालेवाडी क्रीडा संकुल १२ मिनिटे व आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम केवळ १४ मिनिटांच्या अंतरावर आहे.

बंगळुरू – मुंबई महामार्गावर, जेएसपीएम महाविद्यालयाच्या समोर ताथवडे सारख्या मागणी असलेल्या भागात तुलनेने एवढ्या योग्य किंमतीत घरांची अत्याधुनिक, आरामदायी व स्पेसिअस घरांची उपलब्धता हेच या प्रकल्पांचे वैशिष्ट्य आहे. अशी माहिती म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पवन बोबडे,  म्हाडा पुणे यांचे कार्यकारी अभियंता – १ महेश दातार व शिर्के ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीन कदम यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

घरखरेदीसाठी इच्छुक ग्राहकांनी ईडन गार्डन प्रकल्पाला भेट द्यावी व प्रकल्पात तयार असलेल्या शो फ्लॅटला भेट द्यावी किंवा अधिक माहितीसाठी 7447440008 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन म्हाडा तर्फे करण्यात आले आहे.

म्हाडाने आतापर्यंत राज्यभरात साडे सात लाख समाधानी कुटुंबांसाठी घरांची उभारणी केली आहे. सामान्य माणसाच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात आम्ही सातत्याने व प्रयत्नशील आहोत. पुण्यातही ताथवडे सारख्या मागणी असलेल्या व अगदी महामार्गावर असलेल्या या प्रकल्पांत कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय अगदी आवाक्याच्या किंमतीत पण आरामदायी घर व सुविधा उपलब्ध असणाऱ्या घराचे स्वप्न पूर्ण करता येईल. मोक्याच्या लोकेशनवर अत्याधुनिक आणि आरामदायी सुविधांसह या प्रकल्पांत ग्राहकांना गुणवत्तापूर्ण घर देण्यासाठी म्हाडा कटिबद्ध आहे. या प्रकल्पातील घरे तुमच्या ग्राहकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व गरजा पूर्ण करतील असा आमचा विश्वास आहे.

——अशोक पाटील

मुख्य कार्यकारी अधिकारी,

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा)

पुणे विभाग

प्रकल्पातील सुविधा

*- स्विमिंग पूल

*- सांडपाणी प्रक्रिया व व्यवस्थापन

*- लोकप्रिय ताथवडे उपनगरात मध्यभागी लोकेशन

*- क्लबहाऊस

*- चार चाकी पार्किंग

*- सेंद्रिय पद्धतीने कचरा व्यवस्थापन

*- रेन वॉटर हार्वेस्टींग

*- प्रत्येक सदनिकेसाठी तीन बाल्कनी

*- लँडस्केप गार्डन

*- खेळणीसह मुलांच्या खेळासाठी स्वतंत्र जागा

*- ओपन जिम

*- प्रत्येक इमारतीत हाय स्पीडच्या तीन स्पेसिअस लिफ्ट

*- कॉमन एरीयासाठी सोलर एनर्जीचा पुरवठा

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *