Lalit Patil Drug Case –ड्रग्ज तस्कर (Drug traffickers) ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणात ललितला उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस केल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) डॉ. संजय मरसाळे (Dr. Sanjay Marsale) यांना गुन्हे शाखेने सोमवारी अटक केल्यानंतर मंगळवारी ससून रूग्णालयातील (Sasoon Hospital) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) डॉ. समीर देवकाते (Dr. sameer Deokate) यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. डॉ. देवकाते यांना (Dr. Deokate) अटक करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. डॉ. देवकाते हे ऑर्थोपेडिक्स स्पेशालिस्ट (orthopedic Specialist) आहे. (Medical officer of Sassoon Dr. Sameer Devkate arrested)
याप्रकरणी डॉ. प्रवीण दादासाहेब देवकाते ( ४०) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. देवकाते यांना सोमवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली.ललित पाटीलला ऑर्थोपेडिक्स संदर्भातील कोणतेही दुखणे नसताना, तो तब्बल दोन महिने डॉ. देवकाते यांच्या देखरेखीखाली उपचार घेत होता. तसेच डॉ. देवकाते हे ललित पाटीलचा भाऊ भुषण पाटील आणि मित्र अभिषेक बलकवडे यांच्या कारण नसताना मोबाइलद्वारे संपर्कात असल्याचेही उघड झाले आहे.
चाकण येथे मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी ललित पाटीलला अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता. आजारी असल्याचा बहाणा करुन ललित ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. ललित ससूनमध्ये उपचार घेत असताना ललित, साथीदार अरविंदकुमार लोहरे, त्याचा भाऊ भूषण, अभिषेक बलकवडे यांनी नाशिक परिसरातील शिंदे गावात मेफेड्रोनची निर्मिती करण्यासाठी कारखाना सुरू केला होता.ससून रूग्णालयातून ललित मेफेड्रोनची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी ससून परिसरात कारवाई करुन ललितच्या दोन साथीदारांना पकडले होते. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ललित २ ऑक्टोबर रोजी ससूनमधील कैद्यांच्या उपचार कक्षातून (वॉर्ड क्रमांक १६) पसार झाला होता.
पोलीसांकडून ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते, येरवडा कारागृहातील समुपदेशकाला अटक करण्यात आली. तपासात येरवडा कारागृहाचे डॉ. मरसाळे यांनी ललितला ससून रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्याचे पत्र दिल्याचे निष्पन्न झाले. डॉ. मरसाळे यांनी ललितकडून पैसे घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना सोमवारी अटक करण्यात आली. तर दुसरीकडे डॉ.देवकाते यांच्याविरुध्दही सबळ पुरावे मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी भादवि कलम २२३,२२४, २२५, १२० (ब), २०१,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी काही डॉक्टरांना अटक होण्याची शक्यता
ललित पाटीलला आश्रय आणि पलायणास मदत केल्याप्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयातील आणखी काही वरिष्ठ डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पुढील आठडाभरात आणखी काही डॉक्टरांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत याप्रकरणात ससून रुग्णालयात बंदोबस्तावर असणारे दोन पोलीस अधिकाऱ्यांसह नऊ जणांना निलंबीत करण्यात आले आहे. दोन पोलीसांना अटक करण्यात आली आहे. येरवडा कारागृहाचा शिपाई मोईस शेख याला अटक झाली असून त्याला देखील सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे यांना अटक करण्यात आली आहे. ससूनचे कॅन्टीन मधील कर्मचारी रौफ शेख याला अटक करुन त्याच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. ससूनच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या जवळील शिपाई महेंद्र शेवते याला देखील अटक करण्यात आली आहे. कारागृहातील एडसचा समुपदेशक सुधाकर इंगळे यास देखील जेरबंद करण्यात आले आहे.
सहाजणांविरुध्द दोषारोपपत्र दाखल
ड्रग माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भादंवि कलम २२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणात आतापर्यंत एकूण १५ जणांना पोलीसांनी अटक केलेली आहे. रोझरी स्कुलचा संचालक विनय अऱ्हाना, त्याचा चालक दत्ता डोके, ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील, मित्र अभिषेक बलकवडे, प्रियसी अॅड.प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम यांच्या विरोधात १२०० पानी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात सादर केले आहे. ललित पाटील यास पळून जाण्याकरिता या आरोपींनी संगनमताने कट रचून पैसे पुरवणे, गाडी पुरवणे, मोबाईलवर संर्पकात राहणे अशापध्दतीने मदत केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.