Pune Municipal Corporation Election :पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आज (शुक्रवार) माघार घ्यायच्या शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग (Suncity Manik Baug) येथून, तर दुसरीकडे प्रभाग 35 ड या सर्वसाधारण जागेसाठी नितीन गायकवाड (Nitin Gaikwad) यांनी अर्ज मागे घेतल्याने त्या ठिकाणी भाजपचे (BJP) श्रीकांत जगताप (Shrikant Jagtap) हे बिनविरोध निवडून आले आहेत. या दोघांच्या बिनविरोध विजयाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष संचारला आहे.
मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure) आणि श्रीकांत जगताप हे दोघेही तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. विशेष म्हणजे मंजुषा नागपुरे यांची उमेदवारी कापण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी केलेला होता. पण पक्षाच्या सर्वेमध्ये (Survey) नाव पुढे असणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) हे सुचवलेले नाव होते. त्यामुळे उमेदवारी कायम राहिली आणि बिनविरोध विजय मिळाला.
अर्ज माघार घ्यायच्या शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक 35 मधून मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या. प्रभाग क्रमांक 35 मध्ये एकूण सहा अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन अर्ज छाननीमध्ये बाद झाले, तर इतर तीन जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. तर दुसरीकडे प्रभाग 35 ड या सर्वसाधारण जागेसाठी नितीन गायकवाड यांनी अर्ज मागे घेतल्याने त्या ठिकाणी भाजपचे श्रीकांत जगताप हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे निवडणुकी आधीच भाजप दोन जागी विजयी झाला.पुणे
















