राज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार – राजेश टोपे


पुणे- राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट अजूनही जास्त आहे त्या ठिकाणी आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे सुतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे त्याठिकाणी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली जाऊ शकते मात्र, संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही असे टोपे यांनी स्पष्ट केल्याने 1 जूननंतर लॉकडाऊन उठणार याकडे डोळे लाऊन बसलेल्यांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुण्यातील साखर संकुल येथे साखर कारखान्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

टोपे म्हणाले, राज्यात अनेक भागात पॉझिटीव्हीटी रेट कमी झाला असला तरी जोपर्यंत हा रेट पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत संकट टळले असे म्हणता येणार नाही.  राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी रणनीती आखली जाते आहे, ऑक्सिजनची उपलब्धता या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल तसेच 30 तारखेपर्यंत परिस्थिती बघून लॉकडाऊन वाढवण्याबाबत  मुख्यमंत्री निर्णय घेतील असे टोपे म्हणाले.

अधिक वाचा  राज्यातील लॉकडाऊन वाढवणार -राजेश टोपे

लसीच्या खरेदीसाठी निधीची कुठली ही अडचण नाही, राज्य सरकार लस खरेदीसाठी लागणारी सर्व रक्कम एका चेक ने द्यायला तयार आहे मात्र केंद्राकडून लस उपलब्धच होत नाही केंद्राने जो कोटा ठरवून दिला आहे तशा लस उपलब्ध होत आहे असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.तसेचराज्यात दररोज 8 लाख ते 10 लाख लसीकरण करू शकतो इतकी आरोग्य विभागाच्या क्षमता आहे असे देखील ते म्हणाले.

राज्यात अधिवेशन न बोलवण्याच्या निर्णयावर विरोधकाकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना टोपे म्हणाले, राज्य सरकारला अधिवेशन घेण्याची हिम्मत नाही अशी टीका जर विरोधक करत असतील तर,पंतप्रधानाना लोकसभेचे अधिवेशन घ्यायची हिंमत आहे की नाही याचीही चर्चा होऊ शकते. सर्व राज्यात हीच परिस्थिती आहे असे देखील ते म्हणाले.

अधिक वाचा  'हम दो हमारे दो'चा नारा,राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी -रामदास आठवले

लॉकडाऊनबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी रणनीती ठरवावी लागेल. कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. पण परिस्थिती थोडी बरी आहे. मात्र लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असंही ते म्हणाले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love