नाथाभाऊंंचं अखेर ठरलं : राष्ट्रवादीकडून मिळणार मंत्रीपद?


मुंबई- भाजपचे नाराज नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे पक्षांतर जवळ- जवळ निश्चित आले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना कृषी खाते देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष आणि पक्षाच्या राज्यातील नेत्यांवर नाराज असलेल्या खडसे यांच्या या भूमिकेमुळे भाजपला मोठा धक्का बसणार आहे. खडसे हे पक्ष सोडणार, ते राष्ट्रवादीत जाणार, शिवसेनेत जाणार  अशा बातम्या अधूनमधून सुरु असायच्या परंतु, खडसे यांनी याचे खंडन केले होते. पक्ष श्रेष्टींकडून काहीच दाखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी  हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जातेय.

अधिक वाचा  फडणवीस यांच्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची शक्ति पण.. संजय राऊत

सध्या कृषी खात शिवसेनेचे दादा भुसे यांच्याकडे आहे. परंतु, खात्यांची अदलाबदल करून खडसे यांना कृषी खाते देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ खडसेंनी अनेकवेळा आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीसांकडून गिरीश महाजनांना मिळणारं बळ आणि त्यांना मिळणारी वागणूक यामुळं संतापलेल्या खडसेंनी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात आपली खदखद बोलून दाखवली आहे. खडसेंची नाराजी विधान सभेतही लपून राहिलेली नव्हती.

दरम्यान, भाजपकडून एकनाथ खडसे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जामनेरमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्या कार्यक्रमाला  वैयक्तिक कारण देत खडसे उपस्थित राहिले नाहीत. तसेच मुंबईमध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीला त्यांनी उपस्थित न राहता व्हिडीओ  कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली होती. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, खडसे यांना उद्देशून “नाथाभाऊ हवं तर बंद खोलीत आमच्या दोन थोबाडीत द्या पण, सारख दांड्यासमोर(चॅनेल) बोलू नका असे आवाहन केले होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love