Judicial custody of Vishal Agarwal and grandfather Surendra Agarwal

विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेन्द्र अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडी

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेन्द्र अग्रवाल यांना न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, आता दोघेही जामीन मिळविण्यासाठी अर्ज करू शकतील. मात्र, ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या प्रकरणात पुणे पोलिस विशाल अग्रवालचा पुन्हा एकदा चौकशीसाठी ताबा घेऊ शकतात, अशी माहिती आहे. त्यामुळे, जामीन मिळाल्यानंतरही पोलिसांचा ससेमिरा विशाल अग्रवालच्या पाठिशी असणार आहे.

पुण्यातील बांधकाम व्यायसाईक विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवली, त्यात अपघात होऊन दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर, पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि त्याचे वडिल सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर कार चालकाला धमकावल्याप्रकरणी, व अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

यापूर्वीच विशाल अग्रवालची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तत्पूर्वी पुणे पोलिसांनी  विशाल अग्रवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळत १४  दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होते. आता, सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनाही १४  दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे, दोन्ही बाप-लेकांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, विशाल अग्रवाल यास जामीन मिळाल्यानंतरही पोलिस चौकशीसाठी त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

विशाल अग्रवालवर विविध गुन्हे

पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवालवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम २०१ अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला ‘तू कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग’ असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आणि आरटीओच्या तक्रारीचेही गुन्हे दाखल आहेत. आरटीओच्या तक्रारीनंतर कलम ४२० च्या अंतर्गत दुसरा गुन्हा विशाल अग्रवालवर दाखल झाला आहे. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना त्याची नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल हा गुन्हा आहे. तर, ड्रायव्हरचे अपहरण व धमकी दिल्याचाही गुन्हा अग्रवाल पिता-पुत्रावर आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *