288 candidates will be fielded for the Legislative Assembly

मस्ती असेल तर विधानसभेत नाव घेवून पाडू- मनोज जरांगे पाटील

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)–मी ग्राउंडवरच्या ओबीसींना कधीच दुखावल नाही, कारण मी नेत्यांवर बोलतो. नेते हे कोणाचेच नसतात. त्यांच्याकडून शांततेचं आवाहन होत नाही. कदाचित त्यांना शांतत बिघडायची असेल. मी निवडणुकीतच नाही मग कस कळणार की कोण निवडून येईल?  मी कोणाच नाव घेवून बोललो नाही की याला पाडा. पण जर मस्ती असेल तर विधानसभेत नाव घेवून पाडू असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मोज जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान, पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या २०१३ च्या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या जरांगे पाटील यांना न्यायालयाने ५०० रुपये दंड ठोठावला. दंड भरल्यानंतर जरांगे पाटील यांचे वॉरंट रद्द करण्यात आले.

शिवबा संघटनेकडून २०१३ मध्ये एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आलेले नव्हते असा आरोप प्रेक्षकांनी केला होता. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार (कलम १५६, (३) ) कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. सुनावणीस उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्यांना वॉरंट बजावले गोते. शुक्रवारी सकाळी ते प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना ५०० रुपये दंड ठोठावला. त्यानंतर जरांगे पाटील यांना बजाविण्यात आलेले वॉरंट रद्द करण्यात आले.त्यानंतर प्रसार मध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे कर्तव्य आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. याविषयी अधिक बोलणे योग्य ठरणार नाही.

तर विधानसभेसाठी २८८ उमेदवार उभे करणार

सगे सोयरे अंमलबजावणी आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर मग विधानसभेच्या रिंगणात २८८ उमेदवार उभे करणार असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिल. सगे सोयरे अंमलबजावणी आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र या मागणीसाठी ४ जून पासून जरांगे आमरण उपोषण सुरू करणार आहेत.

मी जातीवर बोलत नाही

मी पाडापाडीची भाषा केली म्हणजे जातीयवाद होत नाही. आम्ही तर शांततेचंन आवाहन केलं आहे. ते (पंकजा मुंडे आणि ढांजय मुंडे) आवाहन करताना दिसत नाहीत. मी कधीच जातीवर बोललं नाही. दोन्ही समाजाला आवाहन आहे की शांत राहा. मी २३ दिवसापूर्वीच आवाहन केल होत. त्यांच्या बाजूने सुद्धा आवाहन होणं गरजेचं आहे, करतात की नाही बघू असे जरांगे पाटील म्हणाले. मी ग्राउंड वरच्या ओबीसीला कधीच दुखावल नाही, कारण मी नेत्यांवर बोलतो. नेते हे कोणाचेच नसतात. त्यांच्याकडून शांततेचं आवाहन होत नाही. कदाचित त्यांना शांतत बिघडायची असेल, असा आरोप त्यांनी केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *