नाना पाटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन


पुणे–काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे मनोरूग्ण झाले असून रोज ते  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत दर्जाहीन वक्तव्य करीत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज  टिळक चौकात  नाना पाटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, कॉँग्रेसची संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर पीछेहाट होत आहे. त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या नगर परिषदा निवडणुकांमध्ये देखील आला आहे. तसेच महाविकास  आघाडीचे सरकार हे सर्व आघाड्यांवर देखील  अपयशी ठरत आहे. ह्या सर्व गोष्टींपासून महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि सवंग प्रसिद्धीसाठी  काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल रोज  बेताल वक्तव्य करत  आहेत. त्याबद्दल नाना पाटोले आणि कोंग्रेस पक्षाचा   भाजपा पुणे शहर तीव्र शब्दात निषेध करत आहे.

अधिक वाचा  रेस कोर्स मैदानावर मोदींची महाविजय संकल्प सभा : २ लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार

नाना पाटोले आणि कोंग्रेस पक्षाने पंतप्रधान मोदींची त्वरित जाहीर माफी मागितली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. काँग्रेस पक्ष हा संपूर्ण देशातून संपत चालला असून नाना पाटोले  यांच्यासारखी  डोक्यावर परिणाम झालेली व्यक्ती उरल्यासुरल्या  ठिकाणी  देखील कोंग्रेस संपवण्याचे  काम करत आहे. संपूर्ण राज्यातील जनतेत नाना पाटोले यांच्या  अत्यंत अशोभनीय वक्तव्या बद्दल प्रचंड रोष असून राज्यातील जनता ह्या कॉँग्रेसला धडा शिकवल्या शिवाय रहाणार नाही. 

यावेळी नगरसेवक धिरज घाटे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, सुशील मेंगडे, गायत्री खडके, अजय खेडेकर, आरती कोंढरे आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love