संजय राऊत यांच्या ‘हरामखोर’ या विधानावर अमृता फडणवीस यांचा टोला; काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

राजकारण
Spread the love

मुंबई– बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका करत ‘हरामखोर’ असा शब्दप्रयोग केल्याने वादंगाला तोंड फुटले आणि  त्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत शाब्दिक चकमकी घडत आहेत. आता या वादामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत “आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत,” असं म्हणत राऊतांना टोला लगावला आहे.

 मुंबई पोलिसांची मला भीती वाटते’ असं वक्तव्य कंगनाने केले होते.  त्यामुळे, कंगनावर टीकेची झोड सुरु झाली. विशेषत: शिवसेनेने तिला टार्गेट केले. खासदार संजय राऊत यांनी तिच्यावर टीका करीत तिची हरामखोर अशी अवहेलना केली होती. त्यामुळे वातावरण तापले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनावर टीका केल्यानंतर आता शिवसेनेच्या आयटी सेलने कंगना विरोधात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय आता ‘कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा,’ अशी मागणीही केली जात आहे.

 दरम्यान, राऊत यांनी त्यांच्या शब्दात हरोमखोर शब्दाचा अर्थ सांगितल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत राऊतांना टोला लगावला आहे. आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून राऊत यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

आपल्याला एखाद्याचं म्हणणं पटू शकत नाही, पण लोकशाहीत व्यक्त होण्याचा आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. वाद-प्रतिवाद होत रहावेत, पण पोस्टरला चपलांनी मारण हे पातळी घसरल्याचं लक्षण असल्याची प्रतिक्रियाही अमृता फडणवीस यांनी याअगोदर दिली होती.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *