इंटरसिटी स्मार्टबसकडून पुणे-नागपूर मार्गावर भारतातील पहिली प्युरीफाईड एअर बससेवा सुरू

इंटरसिटी स्मार्टबसकडून पुणे-नागपूर मार्गावर भारतातील पहिली प्युरीफाईड एअर बससेवा सुरू
इंटरसिटी स्मार्टबसकडून पुणे-नागपूर मार्गावर भारतातील पहिली प्युरीफाईड एअर बससेवा सुरू

पुणे(प्रतिनिधी)–भारतातील आघाडीच्या इंटरसिटी मोबिलिटी ब्रँड असलेल्या इंटरसिटी  स्मार्टबसने आज पुणे-नागपूर आणि नागपूर-पुणे मार्गांवर इंटरसिटी स्मार्टबस.एक्यूआय सुरू (IntrCity SmartBus.AQI) करण्याची घोषणा केली. त्यामुळे या प्रदेशातील प्रवाशांसाठी भारतातील पहिली शुद्ध हवा देणारी बससेवा उपलब्ध झाली आहे.

पुणे-नागपूर मार्गावरील स्मार्टबस.एक्यूआय सेवेला पुण्यात औपचारिकरित्या आरटीओ पुणे येथील मोटार वाहन निरीक्षक. श्रीपाद भागवत यांच्या सन्माननीय उपस्थितीत झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी इंटरसिटी स्मार्टबस चे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व मान्यवर ही यावेळी उपस्थित होते. दोन शहरांमधील बस प्रवासात आरोग्य, सुरक्षितता आणि आरामदायी दर्जा वाढवण्याच्या कंपनीच्या कटिबद्धतेला अधोरेखित करणारा हा सोहळा इंटरसिटीच्या स्वच्छ-हवेचा प्रवास उपक्रमातील मैलाचा दगड ठरला आहे.

इंटरसिटी स्मार्टबसचे सह-संस्थापक आणि सीईओ मनीष राठी म्हणाले, “पुणे हे आंतरशहर प्रवासाचे एक महत्त्वाचे केंद्र असून पुणे – नागपूरसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांना येथे मोठी मागणी आहे. स्मार्टबस.एक्यूआयच्या माध्यमातून आम्ही बसमधील हवेची गुणवत्ता या प्रवासाच्या एका दुर्लक्षित पैलूवर लक्ष केंद्रित करत आहोत. प्रवाशांना श्वासावाटे स्वच्छ, सुरक्षित हवा घेत घेताना लांब अंतराचा प्रवास करता येईल याची सुनिश्चिती करणे, हे आमचे ध्येय आहे.”

अधिक वाचा  'क्यूआर कोड'सह मिळणार नवीन पॅन कार्ड : नव्या पॅन कार्डची गरज काय?

दोन शहरांदरम्यान प्रवासाच्या मार्गांवर केबिनमधील वायू प्रदूषण जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केलेल्या मर्यादेपेक्षा २ ते ३ पट जास्त असू शकते, असे इंटरसिटीने केलेल्या अंतर्गत पाहणीत आढळून आले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी कंपनीने स्मार्टबस.एक्यूआयला सतत हवा शुद्धीकरण आणि देखरेख प्रणालींनी सुसज्ज करण्यासाठी रिस्पायरर लिव्हिंग सायन्सेस या पुरस्कारविजेत्या हवामान तंत्रज्ञान कंपनीशी भागीदारी केली आहे. या अंतर्गत पायलट प्रयोगात प्रवासाच्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त काळ पीएम २.५ ची पातळी सुमारे ४० µg/m³ वर राखण्यात आली. प्रमुख भारतीय शहरांमध्ये असलेल्या बाहेरील हवेच्या सामान्य पातळीपेक्षा ही लक्षणीयरीत्या स्वच्छ पातळी आहे.

पुणे-नागपूर कॉरिडॉरवरून प्रवास करणारे प्रवासी बुकिंगच्या वेळी इंटरसिटी अॅप किंवा वेबसाइटवरील “इंटरसिटी स्मार्टबस.एक्यूआय” टॅगद्वारे या बसेस सहजपणे ओळखू शकतील. हा टॅग प्रगत ऑनबोर्ड एअर-क्वालिटीकंट्रोल प्रणालीचा निर्देश करतो. प्रवासादरम्यान प्रवाशांना रिअल-टाइम एक्यूआय आणि पीएम २.५ पातळीसुद्धा पाहता येईल. ती ऑनबोर्ड आणि अॅपमध्ये प्रदर्शित केले जाईल, त्यामुळे संपूर्ण पारदर्शकतेची हमी मिळेल.

अधिक वाचा  मुलीच्या तेराव्यासाठी DSK काही तासांसाठी तुरुंगाबाहेर येणार

 

 

 

 

 

 

 

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love