वॉल्टर्स क्लुवर तर्फे पुण्यात इनोव्हेशन हब : अद्ययावत सुविधेसह जागतिक तंत्रज्ञान कंपनीचा भारतात विस्तार


पुणे : व्यावसायिकांसाठी एक्सपर्ट सोल्युशन्स, इनसाईटस् आणि सेवा प्रदान करणार्‍या वॉल्टर्स क्लुवर ने पुण्यात आपले नवीन कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी वॉल्टर्स क्लुवरच्या टॅक्स अँड अकाउंटिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरेन अब्रामसन, ग्लोबल टेक्नॉलॉजी – टॅक्स अँड अकाउंटिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष ब्रायन डिफिन आणि वॉल्टर्स क्लुवर इंडियाचे सरव्यवस्थापक प्रमोद परांजपे यांच्यासह संपूर्ण कंपनीतील नेतृत्व उपस्थित होते.

वॉल्टर्स क्लुवरसाठी भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे. 2006 पासून कंपनीने देशात मजबूत अस्तित्व निर्माण केले असून 2012 पासून पुण्यात कार्यालये कार्यरत आहे. पुण्यातील अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रतिभेचे कौशल्य पाहता, हे शहर वॉल्टर्स क्लुवरसाठी अभिनवतेचे जागतिक केंद्र बनले आहे.

वॉल्टर्स क्लुवरच्या टॅक्स अँड अकाउंटिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरेन अब्रामसन म्हणाले की, आमच्याकडे सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान कौशल्य असल्याचा अभिमान आहे आणि एका नवीन जागेबद्दल कर्मचार्‍यांमध्ये असलेला उत्साह पाहणे आनंददायी आहे. पुण्यातील विस्तार हा आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. एक संस्था म्हणून सहकार्य हे आमच्या कार्यसंस्कृतीचा केंद्रबिंदू आहे  आणि आमचा विश्वास आहे की आमचे आधुनिक कार्यालय आमचे अभियंते आणि डेव्हलपर्सना टॅक्स अ‍ॅन्ड अकाऊंटींगच्या व्यवसायाच्या भविष्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादने विकसित करण्यास नक्कीच प्रेरित करेल.

अधिक वाचा  उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

पारंपारिक कार्यालयीन बसण्याची व्यवस्था व आधुनिक सहकार्यात्मक जागेसह ही शाश्‍वत सुविधा अभिनवता आणि सहकार्याला प्रोत्साहन देते.यामध्ये 1100 जणांची बसण्याची व्यवस्था आहे.सध्याच्या कर्मचार्‍यांमध्ये टॅक्स व अकाऊंटींग क्षेत्राशी निगडीत सॉफ्टवेअर इंजिनिअर्स,व्यवस्थापक व सहाय्यक कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

नवीन कार्यालय वॉल्टर्स क्लुवर इंडिया प्रा.लि.,इंडिक्यूब ऑर्किड,प्लॉॅट 3ए, लूप रोड,शास्त्रीनगर,येरवडा,पुणे – 411006 येथे स्थित आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love