आंतरमहाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाची चमकदार कामगिरी

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

पिंपरी(प्रतिनिधी)–सावित्रीबाई फुले पुणे ,विद्यापीठांतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टींग स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. इंद्रायणी महाविद्यालयाला मुलींच्या गटात सर्वसाधारण विजेतेपद, तर मुलांच्या गटात सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील मुले व मुली या गटामध्ये 70 संघ सहभागी झाले होते.

 या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष गोरख काळोखे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, सदस्य संदीप काकडे, विलास काळोखे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे सहसचिव प्रा. सुनील पानसरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, शारीरिक शिक्षण संचालक सुरेश थरकुडे, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते. 

 यावेळी बोलताना महादेव कसगावडे यांनी सांगितले, की सरकारचा खेळाप्रती दृष्टिकोन बदलत आहे. खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी, तसेच नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी वेगवेगळ्या संधी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घेणे आवश्यक आहे. चंद्रकांत शेटे यांनी महाविद्यालयाच्या क्रीडा कामगिरीचा आढावा घेतला. तसेच महाविद्यालयात तयार होत असलेल्या खेळाचे मैदान, क्रीडा सुविधांची माहिती दिली व भविष्यात याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असे सांगितले.      

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी सांगितले, की विजय पराजयाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी आरोग्याचा दृष्टिकोन समोर ठेवत खेळांमध्ये हिरीरीने सहभागी होण्याची आवश्यकता आहे. तरच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यास मदत होईल.

 स्पर्धेचा समारोप संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या उपस्थितीत झाला. आभार क्रीडा शिक्षिका पी.व्ही. डंबीर यांनी मानले.

विजेत्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे :

मुली 

47 किलो : सारिका शिनगारे (हुतात्मा राजगुरू महाविद्यालय),

52 किलो : चेतना घोजगे (इंद्रायणी महाविद्यालय),

57 किलो : श्रद्धा भोर ( राजमाता जिजाऊ महाविद्यालय),

63 किलो : श्रेया वाळुंज (इंद्रायणी महाविद्यालय),

72 किलो : सेजल मोईकर (इंद्रायणी महाविद्यालय),

84 किलो : स्नेहा शिंदे (अनंतराव थोपटे महाविद्यालय),

84+ किलो : श्रद्धा पवार (अनंतराव थोपटे महाविद्यालय),

मुले :

59 किलो : ओंकार पापळ ( इंद्रायणी महाविद्यालय),

66 किलो : दीपक महाजन (रामकृष्ण मोरे महाविद्यालय),

74 किलो : आदित्य कोंद्रा (अनंतराव थोपटे महाविद्यालय),

74 किलो : तौसिक इनामदार (अनंतराव थोपटे महाविद्यालय),

74 किलो : हर्षवर्धन खराडे ( अनंतराव थोपटे महाविद्यालय),

120 किलो : अजय गुंड (झिल महाविद्यालय),

120+ किलो : पार्थ सावंत ( नूतन महाविद्यालय).

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *