भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या फेक न्यूजचा केला पर्दाफाश

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या फेक न्यूजचा केला पर्दाफाश
भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या फेक न्यूजचा केला पर्दाफाश

नवी दिल्ली / इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाला अखेर शस्त्रसंधी मिळाली आहे. पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांनी भारताच्या डीजीएमओ यांना ३.३० वाजता फोन करून शस्त्रसंधीची माहिती दिली. यानंतर, दोन्ही देशांनी एकाच वेळी गोळीबार, हवाई हल्ले आणि समुद्रावरून होणाऱ्या लष्करी कारवायांवर आज सायंकाळी ५ वाजल्यापासून पूर्णपणे विराम घातला, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी दिली.

शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर, भारताच्या तीनही संरक्षण दलांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये भारतीय नौदलाचे कमांडर रघू आर नायर, भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानच्या फेक न्यूजचा पर्दाफाश केला.

अधिक वाचा  हिंदू समाजाच्या वतीने सामूहिक तर्पण आणि स्मरण संस्कार अखिल भारतीय पातळीवर सुरू व्हावा - प्रदीप रावत

कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, भारताने एकाही मशिदीवर हल्ला केला नाही. “भारत हा एक निधर्मी देश आहे आणि आमच्या सैन्याने कधीही धार्मिक स्थळांवर हल्ला केलेला नाही,” असे त्या  म्हणाल्या. पाकिस्तानच्या मीडिया आणि लष्करी संस्थांनी काही खोटी माहिती पसरवली होती, ज्याचा भारतीय सैन्याने खुलासा केला.

पाकिस्तानने काही खोटे दावे केले होते, ज्यात भारताने पाकिस्तानच्या जेफ-17 जेट, एस-400 आणि ब्रह्मोस मिसाईल बेसला नुकसान पोहोचवले, असा आरोप केला होता. “हा दावा पूर्णपणे खोटा आहे. पाकिस्तानने आणखी सांगितले की, सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नलिया आणि भूज येथील एअरबेसवर हल्ले झाले. हा देखील चुकीचा दावा आहे,” असं कर्नल कुरेशी म्हणाल्या.

पाकिस्तानने चंदीगड आणि बियासमधील म्युनिशन डंप्सवर हल्ला झाल्याचा दावा केला होता. “हे देखील खोटं आहे. भारतीय सैन्याने त्यांचा एकाही धार्मिक स्थळावर हल्ला केलेला नाही,” असं विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले.

अधिक वाचा  मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा म्हणजे चांगले काम थांबवण्याचा कट : अरविंद केजरीवाल

भारताने पाकिस्तानच्या लष्करी सुविधा, एअरबेस, रडार सिस्टीम आणि आक्रमक तसेच रक्षणात्मक क्षमतेला मोठं नुकसान केल्याची माहिती दिली. “भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या एअरबेस जखूबाबाद, बुलारी, आणि अन्य ठिकाणांना नुकसान पोहोचवले आहे,” अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.

कर्नल कुरेशी यांनी पाकिस्तानला ठणकावले, “भारतीय सैन्य दल पूर्णपणे सज्ज आहे, सतर्क आहे, आणि भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे.”

कमांडर रघू आर नायर यांनी सांगितले की, “सर्व लष्करी कारवाया, समुद्र, जमीन आणि आकाशातून होणाऱ्या हल्ल्यांना शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर थांबवण्यात आले आहेत.”

विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, “आमचे ऑपरेशन दहशतवाद्यांच्या कॅम्प आणि त्यांच्या वापरातील सुविधांवर होते, जे भारताच्या विरोधात वापरले जात होते.”

या सर्व स्पष्टीकरणामुळे पाकिस्तानच्या फेक न्यूजला विरोध करत भारतीय सैन्याने आपली बाजू मांडली आणि शांततेचा मार्ग ठरवला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love