राष्ट्र सेविका समिति, सिंहगड भागातर्फे विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्र पूजन व सघोष पथसंचलन उत्साहात संपन्न

पुणे- राष्ट्र सेविका समिति, सिंहगड भागातर्फे विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्र पूजन व सघोष पथसंचलन उत्साहात संपन्न झाले. धायरी येथील विजयनगर सोसायटी पासून सुरू झालेले हे पथ संचलन  रेनबोलॅंड शाळेवरून भवानी स्वीट डी एस के चौकातून मार्गस्थ होत पुन्हा विजयनगर सोसायटीला समारोप  झाला.

पथ संचलनाच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या सौ.  अपर्णा नागेश पाटील, पुणे महानगराच्या सौ.  हर्षदा धोडपकर, मंजिरी होशिंग आदी अधिकारीचे  हस्ते शस्त्रपूजन व वाद्य पूजन करण्यात आले.  परिसरातील महिलांनी ध्वजाला औक्षण  केले. सिंहगड भागातील धायरी नगरात झालेल्या या  पथसंचलनाचे स्वागत विविध ठिकाणी स्वागत कमानी, बॅनर लावून करण्यात आले . यावेळी  उत्स्फूर्तपणे   नागरिकांनी पुष्प वृष्टी करत भारत मातेचा  जयजयकार केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  वंध्यत्वावर मात करण्यासाठी ओएसिस फर्टिलिटीची 'चुप्पीतोडो मोहीम'