पुणे- भारत हा फायटर एअर क्राफ्ट, मिसाईल, सॅटेलाईट, रडार यंत्रणा आणि अन्य सरंक्षण उपकरण निर्मितीत स्वयंपूर्ण आहे. सध्याला भारत आपल्या मित्र देशांना अनेक संरक्षण उपकरणे निर्यात करतो आहे. परदेशात शस्त्रांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये जागतिक शस्त्र निर्यातदारांच्या यादीत भारत प्रथम स्थान मिळवले, असा विश्वास संरक्षण विभागाचे सचिव (रिसर्च आणि डेव्हल्पमेंट) व डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी व्यक्त केला.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा 6वा वर्धापन दिवस बुधवारी 11 ऑगस्ट 2021 रोजी ऑनलाईन माध्यमांद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी संघ लोकसेवा आयोग (UPSC), नवी दिल्लीचे सदस्य एअर मार्शल श्री. अजित शंकरराव भोसले, माईर्स एमआयटी ग्रुपचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड, माईर्स एमआयटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ. सुनीता मंगेश कराड, प्रा. ज्योती कराड ढाकणे, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्या डीन, डायरेक्टर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. जी. सतीश रेड्डी म्हणाले, जगात स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये ही वाढ होत आहे. भारताने पीएसएलव्ही सॅटेलाईट लाँचर द्वारा 40 पेक्षा अधिक सॅटेलाईट अवकाशात सोडले आहेत. जीएसएलव्ही सॅटेलाईट लाँचरद्वारे अवजड सॅटेलाईट अवकाशात सोडले आहेत. भारतात चंद्रयान, मार्सयान आणि अवकाशात माणसाला पाठविण्यासाठी विविध स्तरावर काम सुरू आहे. संरक्षण विभागाद्वारे विविध प्रकारच्या नवीन तंत्रज्ञान लाँच केले जात आहे. आज आपण फायटर एअर क्राप्ट, बॅटल टँक तयार करणाऱ्या देशात जगात 6 तर सुपरस्स्वॉनिक ब्रम्होस्त्र मिसाईल निर्मितीत जगात 4थ्या क्रमांकाचा देश बनलो आहे. पुण्यामध्ये जगातील सर्वाधिक रेंज असलेली बुंदुक तयार करण्यात येत आहे. डीआरडीओ स्टार्ट अप कंपन्यांच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा विकास करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. डिफेन्स टेक्नॉलॉजी निर्यात करणार देश म्हणून ओळख निर्माण करायची आहे. यासाठी विद्यापीठ आणि शिक्षण संस्था महत्वाच्या भूमिका निभावतील. डीआरडीओने देशात अनेक सेंटर ऑफ एक्सलस विभाग सुरू केले आहे. डीआरडीओने 3 हजारापेक्षा अधिक शिक्षण संस्था सोबत सामंजस्य करार केले आहेत. मटेरिअल साईन्सच शिक्षण देणाऱ्या संस्था सोबत एक दशकाचा करार करून काम करणार आहे. डिफेन्स तंत्रज्ञानावर अभ्यासक्रम सुरू करणार आहे, यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. सध्याला देशातील 8 हजार विद्यार्थी डीआरडीओच्या लॅबमध्ये इंर्टनशीप करत आहेत. त्यांना डिफेन्स तंत्रज्ञानावर अभ्यास करण्याची संधी दिली जात आहे. एका इनक्युबेटर विद्यार्थ्यांला 1 करोड रुपये तर इंडस्ट्रीला 10 करोड रुपयाचा अनुदान देऊन नवनिर्मितीला प्रोत्साहन देणार आहे. बायोइंजिनिअरिंग लॅब, फुट टेक्नॉलॉजी लॅब, मरीन इंजीनिअरिंगच्या लॅबमध्ये संशोधनाला प्रोत्साहन मिळेल. डिफेन्स तंत्रज्ञानावर अभ्यासक्रम तयार कोर्स सुरू करावा.
एअर मार्शल श्री. अजित शंकरराव भोसले म्हणाले, व्हॉलिस्टिक डेव्हल्पमेंटच्या माध्यमातून यशस्वी व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य विद्यापीठांच्या द्वारे व्हावे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान आणि स्किल्सला वाढविण्यासाठी कार्य करावे. शिक्षकांनी देशविकासासाठी आपली जबाबदारी ओळखून कार्य करत राहवे. राष्ट्रीय चारित्र, राष्ट्रभाव, राष्ट्रीयता आणि राष्ट्र निर्माणासाठी कर्तृत्व हे गुण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावे. कोरोना महामारीमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे मोठे नुकसान होत आहेत. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात शिक्षणाची दरी निर्माण झाली आहे. वेबिनार, परीक्षा, ऑनलाईन शिक्षण पद्धती आत्मसात केल्या आहेत. ग्रामीण क्षेत्रातील शिक्षण व्यवस्थेला मजबुत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. आम्हाला समस्याचे समाधान करणारे शिक्षण प्रदान करावे लागेल. प्रोजेक्ट बेस अभ्यासक्रम तयार करून उद्योजक, संशोधन आणि इनोव्हेटरद्वारा समाजाच्या विकासासाठी हातभार लावावे.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, संशोधन, नवनिर्मिती आणि सर्जनशीलता याचा वापर एमआयटी एडीटी विद्यापीठ आपल्या अभ्यासक्रमांत करत आहेत. जागतिक स्तरावरील आत्याधुनिक शिक्षण पद्धतीने मुल्यात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. विज्ञानासोबत अध्यात्माचे शिक्षण देत सर्व समस्यांचे समाधान करणारे शिक्षण द्यावे. एमआयटी एडीटी विद्यापीठ व्हॉलिस्टिक पीस लव्हिंग सोसायटी निर्माणसाठी काम करत आहे. विश्वगुरूची शक्यता आहे.
दरम्यान, ॲपल कंपनीद्वारे संचालित ट्रेनिंग सेंटर, एमआयटी स्कूल इडियन सिव्हिल सर्व्हिसेस आणि भाषांतर आणि तथ्य तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. राहुल कराड, प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रा. स्वप्निल शिरसाठ व प्रा, स्नेहा वाघटकर यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव यांनी आभार मानले.