MLA Sunil Tingre should be investigated

#हीट अँड रन प्रकरण : डॉ. तावरेंनी कोणाच्या सांगण्यावरुन ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केला? : आमदार सुनील टिंगरेंच्या अडचणीत वाढ

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)–पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणात अजित पवार गटाचे वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव सुरुवातीपासून चांगलंच चर्चेत असताना आता आणखी एक गोष्ट समोर आली आहे त्यामुळे आमदार सुनील टिंगरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ‘ब्लड सॅंपल’मध्ये हेराफेरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांच्यासाठी  आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून २०२३ मध्ये शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दिनांक १९ मे रोजी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला उडवले होते. त्यामध्ये त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, त्या रात्री वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यामुळे, राजकीय दबाव आणि पैशांच्या जोरावर अग्रवाल पिता-पुत्रांकडून कायद्याची ऐशीतैशी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही झाला. ते आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते आरोप आणि त्यासाठी त्यांनी पैशांचे वाटप केल्याच्या चर्चाही केल्या जात आहेत. दरम्यान, टिंगरे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांचा इन्कार करत येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचे मान्य केलं होतं. मात्र,कोणत्याही प्रकारे पोलीस कारवाईमध्ये हस्तक्षेप केला नसल्याचा दावा त्यांनी केला होता. आता डॉ. अजय तावरे यांच्यासाठी  आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून २०२३ मध्ये शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने टिंगरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

डॉ. तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले होते. विशेष म्हणजे या पत्रानंतर अजय तावरेंची ससून रुग्णालयाच्या डीन पदावर  नियुक्तीही करण्यात आली होती. मात्र, गेल्याच महिन्यात वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. अजय तावरेंची डीन पदावरुन हकालपट्टी केली आहे. पण, आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारसीनंतरच अजय तावरेंना ससून  रुग्णालयाचे डीन केल्यामुळे आमदार टिंगरे हे पुन्हा अडचणीत आले आहेत. कारण, डॉ. तावरें या प्रकरणाता आता आरोपी बनले आहेत. दरम्यान, सुनील टिंगरे हे देवदर्शनासाठी बाहेर गेले असल्याचं सांगण्यात येत आहे.

डॉ. तावरेंनी कोणाच्या सांगण्यावरुन ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केला?

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डॉ. अजय तावरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. २९  डिसेंबर २०२३  रोजी अजय तावरे यांनी ससूनच्या अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिले होते. तर, हसन मुश्रीफ यांनीही तावरे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले होते. त्यामुळे, तावरेंनी कोणाच्या सांगण्यावरुन ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केला, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *