लॉकडाऊननंतर एका वर्षाच्या कालावधीत घटस्फोट, बालविवाह आणि बाल अत्याचारांमध्ये वाढ :काय आहेत कारणे?


पुणे- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागच्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाच्या कालावधीत कोरोनाचा परिणाम होऊन अनेक घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात या एक वर्षात कौटुंबिक कलहात वाढ झाली असून या एका वर्षात  पुणे जिल्ह्यात 1192 जणांनी कौटुंबिक न्यायालयात, घटस्फोटासाठी केला अर्ज केला आहे.  त्यापैकी 1009 जोडप्यांनी घटस्फोट घेतला आहे. तर दुसरीकडे या काळात बाल विवाहाच्या घटनाही समोर आल्या आहेत. वर्षभरात पुणे जिल्ह्यात 51 बालविवाह झाले आहेत. तसेच बाल अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

पुणे जिल्ह्यात 1192 जणांनी कौटुंबिक न्यायालयात, घटस्फोटासाठी केला अर्ज होता,त्यातल्या तब्बल 1009 जोडप्यानी  घटस्फोट घेतला असल्याची आकडेवारी आहे. घटस्फोट घेण्यासाठी  वाढत्या अपेक्षा ठरतायेत कारणीभूत ठरल्या. तसेच नोकरी जाणे, आर्थिक चणचण हे देखील कारणीभूत ठरले आहेत.

अधिक वाचा  फेसबूकवर ही पोस्ट टाकत पुण्यातील प्राध्यापकाची आत्महत्या

कोरोनामुळं आर्थिक संकटाचा सामना हा सर्वानाच करावा लागला मात्र या परिस्थितीचा सामना करता करता कुटुंबात निर्माण झालेली दूफळी ही, काही दाम्पत्याच्या घटस्फोटाला कारणीभूत ठरली.पूर्वी साथीदार वेळ देत नाही म्हणून दाम्पत्यामध्ये वाद व्हायचे मात्र लॉकडाऊन मुळे सतत एकत्र असल्याने वाद वाढले, सतत सोशल मीडियाच्या वापरामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले, त्या सोबतच  पती-पत्नीमधील अहंकार,  लॉकडाऊनमुळे  जोडीदाराची झालेली पगारकपात, नोकरी गेल्यामुळं आलेलं नैराश्य आणि त्याचा झालेला कुटुंबावरील परिणाम, आणि यातूनचं कुटुंबात झालेली वादावादी अशी अनेक कारणं या घटस्फोटाना आहेत. त्यामुळे कोरोना नंतर निर्माण झालेली ही परिस्थिती जीवनातील अनेक घटकांवर विपरीत परिणाम करून गेली आहे, आणि कुटूंब व्यवस्थेची नाळ बळकट नसलेल्या कुटूंबाना या काळात फटका बसला असेच यावरून दिसून येते आहे.

अधिक वाचा  राज्यात आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढणार - राजेश टोपे

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बाल विवाहाची 51 प्रकरणे समोर आली आहेत. जिल्ह्यात खासकरून इंदापूर, बारामती,  चाकण,  राजगुरुनगर  तसेच पुणे शहरा लगतच्या गावामध्ये ही बाल विवाहाची प्रकरणे पहायला मिळाली. तसेच इतर बाल अत्याचाराच्या घटना देखील कमी झालेल्या नसल्याचे समोर आले आहे..मुलांसाठी काम करणाऱ्या पुण्यातील ज्ञानदेवी सामाजिक संस्थेच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

मार्च 2020 ते मार्च 2021 बाल अत्याचाराची प्रकरणे

लैगिक शोषण- 29

बालकामगार -54

बालभिकारी- 64

बालविवाह -51

आत्महत्याविषयक -8

गुंडगिरीची दहशत -5

घरी पोहोचविणे- 16

एकूण अत्याचारातून मुक्तता -363

मानसिक अत्याचार -111

संस्थात्मक शोषण -33

शारिरीक व मानसिक अत्याचार -123

व्यसनाधीनता – 11

मानवी वाहतूक – 12

 .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love