पुण्यात पुन्हा हिट अँड रन; भरधाव कारने पोलिसांना उडवले : पोलीस हवालदाराचा मृत्यू, अन्य एक कर्मचारी गंभीर जखमी, आरोपी अटकेत

पुण्यात पुन्हा हिट अँड रन; भरधाव कारने पोलिसांना उडवले
पुण्यात पुन्हा हिट अँड रन; भरधाव कारने पोलिसांना उडवले

पुणे(प्रतिनिधी) -पुणे व मुंबईतील ‘हिट अँड रन’ प्रकरण ताजे असतानाच शहरातील बोपोडी चौकात भरधाव अज्ञात कारने पोलिसांच्या वाहनाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱयाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा सहकारी कर्मचारी यात गंभीर जखमी झाला. सोमवारी मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला.

समाधान कोळी असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तर बीट मार्शल कर्मचारी संजोग शिंदे हे यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुबी हॉल क्लिनिक येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या  गंभीर आणि दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रुबी हॉलमध्ये जाऊन मयत पोलीस कर्मचाऱयाच्या नातेवाईकांची भेट घेतली, तर जखमी झालेल्या कर्मचाऱयाची डॉक्टरांकडे विचारपूस केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी अंडरपास हॅरिस ब्रिजजवळ हा भीषण अपघात घडला. खडकी पोलीस ठाण्याचे खडकी बाजार बीट मार्शल कर्मचारी संजोग शिंदे आणि पोलिस हवालदार समाधान कोळी हे दोघे एका दुचाकीवर हॅरिस पुलाकडून खडकीच्या दिशेने येत होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अनोळखी कार चालकाने त्यांना जोरात धडक दिली. अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळी न थांबता भरधाव वेगात निघून गेला. पहाटे एक वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली आणि यात समाधान कोळी यांचा डोक्मयास इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पसार झालेल्या अनोळखी वाहनचालकाचा तपास सुरू केला. अपघातानंतर पसार झालेल्या संबधित वाहनचालकाविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

अधिक वाचा  संगमनेर येथे रिलायन्स रिटेलचा स्मार्ट बाजारचे पहिले स्टोअर सुरु

आरोपीने मद्यपान करून वाहन चालविल्याचा संशय 

या अपघातप्रकरणी प्रसार झालेला आरोपी सिद्धार्थ केंगार (रा. बोपोडी, पुणे ) याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. दारूच्या नशेत त्याने वाहन चालविण्याचा पोलिसांना संशय असून त्याची खातरजमा करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले आहे. याबाबत खडकी पोलीस ठाण्याचे वरि÷ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर म्हणाले, आरोपीने मद्य प्राशन केले होते की नाही, याबाबत त्याच्या रक्ताचा नमुन्याचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. अपघातग्रस्त गाडी ही बाणेर येथील रहिवासी मुकेश आटवल यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. त्यांनी रॉबिन नावाच्या मित्राकडे ती सर्व्हिसिंग कामासाठी दिली होती. सिद्धार्थ केंगार याला सदर गाडी त्याने दिल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.

आरोपीवर ३०४  कलम लावले 

अधिक वाचा  भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण

आरोपी सिद्धार्थ केंगार हा साई सर्व्हिस याठिकाणी मेकॅनिक आहे. अपघातानंतर घरापासून काही अंतर दूर गाडी लावून तो घरी जाऊन झोपी गेला होता. त्याच्यावर पोलिसांनी भादवी कलम 304 नुसार कारवाई केली आहे.

 अपघातापूर्वी बेपत्ता मुलीस घरीसुखरूप पोहोचवले

हिट अँड रन प्रकरणाच्या अगोदरच्या रात्री १ वाजून ७ मिनिटांनी गस्तीवर असलेले पोलीस हवालदार समाधान कोळी आणि संजय शिंदे यांना खडकी भागातील बस स्टॉपवर मध्यरात्री 11 वर्षांची मुलगी आढळून आली होती. या दोघांनी तिच्याकडून आई-वडिलांचा नंबर घेतला होता. ती पिंपळे सौदागर भागात रहात असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर या दोघांनी मुलीच्या आई-वडिलांना बोलावले होते. खातरजमा करून मुलीला सुखरूप त्यांच्याकडे सोपवले. तसा फोटो पोलीस हवालदार समाधान कोळी आणि संजय शिंदे यांनी पोलिसांच्या ग्रुपवर पोस्ट केला होता. यानंतर दोघे खडकी बाजार भागातून बोपोडी भागात आले असताना एक वाजून 36 मिनिटांनी हा अपघात झाला. त्यातच समाधान कोळी यांचा मृत्यू झाला.

अधिक वाचा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा निकाल जाहीर:खुला प्रवर्ग वगळता अन्य पाच प्रवर्गाचे निकाल आतापर्यंत जाहीर

 आणखी एका पोलीस कर्मचाऱयाचा अपघाती मृत्यू

दरम्यान, आणखी एका पोलीस कर्मचाऱयाचा वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पोलीस हवालदार सचिन विष्णू माने, (वय 48 रा. आदित्य अपार्टमेंट, स्पाईन रोड, मोशी) हे ऍक्टिवावरून कोकणे चौक ते नाशिक फाटा प्रवास करत असताना पिके चौकाजवळ, पिंपळे सौदागर येथे अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सीआयडीचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या वाहनावर ते चालक म्हणून काम करत होते. पिंपळे सौदागर बीआरटी मार्गात हा अपघात झाला आहे.

पत्रकाराला वाहनाने उडवले 

तर मुंबई-बेंगळूर महामार्गावर डिकेथ लोनसमोरील महामार्ग रस्ता ओलांडत  असताना मुंबईकडून येणाऱया लेनवरील ट्रकने जोरात धडक दिल्याने शरद वसंत गायकवाड ( वय 42 वर्ष , चिंचवड, पुणे) या पत्रकाराचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. गायकवाड हे पिपंरी चिंचवड शहरात पत्रकार म्हणून काम करत होते आणि न्यूज 24 या वेब पोर्टलचे कामकाज ते पाहत होते.

 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love