श्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन


पुणे: भारतातील आपल्या व्यवसायाचा विस्तरा करण्याचा दृष्टिकोन बाळगत श्माल्झ इंडिया प्रा. लिमिटेडने आज पुण्यातील आपले दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे उप महावाणिज्यदूत, मुंबईच्या मार्जा एनिग यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी अँड्रियास ब्यूटेल (व्यवस्थापकीय संचालक – जे. श्माल्झ जीएमबीएच), फिलिप जे. मणी (व्यवस्थापकीय संचालक – श्माल्झ इंडिया),  वोल्कर ब्रुक (प्रोजेक्ट हेड इंटरनॅशनल – जे. श्माल्झ जीएमबीएच) आणि श्रीमती प्रिया मणी (एमपीसीसी जनरल सेक्रेटरी – अल्पसंख्याक विभाग) उपस्थित होते.  यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते

हे नवे केंद्र भोसरी एमआयडीसीतील सध्याच्या कारखान्यापासून सुमारे १५० मीटर दूर आहे.या नव्या कारखान्यामुळे सर्वोत्तम दर्जाच्या जर्मन आणि एर्गोनॉमिक सोल्यूशन्स भारतीय बाजारपेठेत सादर करण्याबद्दल श्माल्झची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित झाली आहे. तेही संपूर्ण भारतात पसरलेल्या मजबूत सेवा आधारासह. 

पुढील दोन वर्षांत १०० करोड रुपयांची उलाढाल करण्याची कंपनीची योजना आहे जेणेकरून सध्याची उलाढाल दुप्पट होईल. व्हॅक्यूम ऑटोमेशनच्या क्षेत्रात कंपनीचा बाजारपेठेतील वाटा ३५ टक्के असून हँडलिंग सिस्टिमच्या एकूण १५०  कोटी रुपयांच्या बाजारपेठेत तिचा वाटा ५० टक्के पेक्षा जास्त आहे.

अधिक वाचा  पुण्याच्या कोथरूड भागात रानगव्याचे दर्शन: उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

हा नवीन कारखाना ही हँडलिंग सिस्टमसाठी पुढचे पाऊल असून कंपनी ते भारतीय ग्राहकांना पुरविण्यासाठी जर्मनीतून आयात करते. ही उत्पादने आता असेंब्ल करण्यात येतील आणि काही भाग हे स्थानीय पातळीवरही केले जातील. ते त्यांच्या जर्मन पुरवठ्याप्रमाणेच असतील त्यामुळे दर्जाचे प्रमाण हे कायम राखले जाईल. हा कारखाना १५ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह उभारण्यात आला आहे. या कारखान्याची सुरुवातीची क्षमता ३५ टक्के असेल ती सध्याच्या व्यवसायाची पूर्ती करेल. तिच्यात ६५ टक्के वाढीची क्षमता असून ती उलाढाल दुप्पट करण्यासाठी उपयोगात येईल.

येत्या काळात कंपनी भारतात स्थानिक पातळीवर केलेले व्हॅक्यूम हँडलिंग सिस्टिम्स उपलब्ध करून देईल. याशिवाय आपल्या “बिनार” या नवीन ब्रँडसह ताजी उत्पादने भारतीय बाजारपेठेत सादर करण्याचीही त्यांची योजना आहे. जम्बो, व्हॅक्यूमास्टर, बिनार निओ 30, बिनार क्विकलिफ्ट आणि बिनार क्यूएलआर रेंज ही उत्पादने सादर करण्यात येतील.

अधिक वाचा  पुणे शहरात विविध अपघातात चार जणांचा दुर्देवी मृत्यू 

उत्पादनांच्या श्रेणीमध्ये व्हॅक्यूम हँडलिंग सिस्टिम्स आणि व्हॅक्यूम ऑटोमेशन उपलब्ध असतील. यात जम्बो, व्हॅक्यूमास्टर, बिनार निओ३०, क्विकलिफ्ट आणि क्यूएलआर हे व्हॅक्यूम हँडलिंग सिस्टिम्स असतील. व्हॅक्यूम ऑटोमेशनमध्ये व्हॅक्यूम पिक आणि प्लेस प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी ते संपूर्ण ग्रिपर्स आणि सुटे भाग उपलब्ध करून देतील. यात व्हॅक्यूम जनरेटर्स, फिल्टर्स, कनेक्टर्स, व्हॅक्यूम कप्स आणि व्हॅक्यूम सेन्सर्स यांचा वापर केलेला असेल.

 यावेळी जे. श्माल्झ, जीएमबीएचचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अँद्रियास ब्यूटेल म्हणाले, “हा मैलाचा दगड गाठल्याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे आणि भारतीय बाजारपेठेत सर्वोत्तम सेवा व उत्पादने आम्ही देऊ याचा आम्हाला विश्वास आहे. भारत आणि विशेषतः पुणे हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे रणनीतिक स्थान आहे. भविष्यात आणखी गुंतवणूक करून स्थानिक युवकांसाठी अधिक रोजगार निर्माण करण्याचे आम्ही आश्वासन देतो. आम्ही एकूण १०० जणांना रोजगार दिला असून निकट भविष्यात ही संख्या २०० होऊ शकते.” 

अधिक वाचा  सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं... आता निलंबनाचा प्रश्नच नाही -जयंत पाटील

श्माल्झ इंडिया प्रा. लिमिटेडचे संचालक श्री. फिलिप जे. मणी म्हणाले, “या नव्या घडामोडीने आम्ही निश्चितच उत्साही आहोत. भारतात अधिक चांगला आणि दर्जेदार व्यवसाय करण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सक्शन कप्सचे २००३ पासून स्थानिकीकरण करून आम्ही पॅकेजिंग, प्लास्टिक्स आणि स्वयंचलन उद्योगाला आधीच मदत केली आहे. आता हँडलिंग सिस्टिम्सना सेवा देऊ शकणाऱ्या या नवीन कारखान्यामुळे आमचे लक्ष आता खाद्य, औषधी, साधनसामुग्री, टायर आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाकडे लागले आहे. आम्ही एका नव्या पातळीला पोचलो आहोत आणि ही आमच्यासाठी खरोखर अत्यंत अभिमानाची बाब आहे. अनेक वर्षांपासून सातत्याने केली जाणारी गुंतवणूक हे सिद्ध करते की आम्ही येथे राहणार आहोत. आम्ही भारतीय ग्राहकांना हमी देतो, की त्यांना दीर्घकाळापर्यंत दर्जेदार उत्पादने आणि सेवा मिळत राहतील.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love