शंकर महाराज मठ परिसरात मानपानावरून  गुरुवारी भाजपचे दोन गट भिडले

Two factions of the BJP clashed on Thursday in the area of ​​Shankar Maharaj Math
Two factions of the BJP clashed on Thursday in the area of ​​Shankar Maharaj Math

पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील सातारा रस्त्यावरील सदगुरू शंकर महाराज मठ परिसरात मानपानावरून  गुरुवारी भाजपचे दोन गट भिडले असल्याचे बोलले जात आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी असलेले नितीन कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सदगुरू शंकर महाराज मठ येथे हाणामारीचा प्रकार घडल्याचा दावा नितीन कदम यांनी केला आहे. दरम्यान, यावेळी नुकतेच केंद्रीय मंत्री झालेले मुरलीधर मोहोळ देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.

या व्हिडिओमध्ये मंदिराच्या बाहेर दोन गटातील कार्यकर्ते एकामेकांसमोर आल्याचं पाहायला मिळत आहेत. मंदिराच्या परिसरामधील असलेला ह्या दोन सेकंदाच्या व्हिडिओत मारहाणीची दृश्य पाहायला मिळत आहेत.

अधिक वाचा  चॅनल पार्टनर्ससोबत उत्तम समन्वयासाठी क्रेडाई पुणे मेट्रोचे नवे पाऊल

नितीन कदम यांनी पोस्टमध्ये, “सदगुरू शंकर महाराज मठ अशी पवित्र जागा देखील भाजपच्या गुंडांनी सोडली नाही! तेथे देखील हाणामारीचा प्रकार… दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हेच भाजपचे गुंड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटत होते.. प्रश्न हा आहे की पोलिस आयुक्त कारवाईचे धाडस दाखवणार का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा चांगल्या मताधिक्याने विजय झाला आहे. पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्याने पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. यामुळे भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांच्या अभिनंदनाचे कार्यक्रम विविध भागात घेण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच एका कार्यक्रमात भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याचं समोर आलं आहे. मात्र, असं काहीच घडलं नसल्याचं सांगत भाजपने या प्रकरणापासून आपले हात झटकले आहेत.

अधिक वाचा  ईटशुअर हे भारतातील पहिले स्मार्ट फूडकोर्ट पुण्यात सुरू

भाजपचा संबंध नाही – धीरज घाटे

याबाबत भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्याशी संपर्क साधला. घाटे म्हणाले, “केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे त्या ठिकाणी दर्शनाला गेले असता तेथील मंदिर प्रशासन आणि दर्शनाला आलेल्या लोकांमध्ये मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद झाला आहे. तिथे भाजपच्या कोणत्याही गटात वाद झाला नाही. अथवा त्यात भाजप कार्यकर्त्यांचा कोणताही संबंध नाही.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love