ईडी फिडीला मी काय घाबरत नाही : का म्हणाले असे गिरीश बापट


पुणे- आजपर्यंत अनेक आंदोलनं केली असून आमच्याकडे ईडीला (ED) येऊन काय मिळणार आहे. आमच्या खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळणार,  असे संगत ईडी येऊ देत आणि जाऊ देत, आमच्यासाठी ED म्हणजे रिक्षाचालक आहे असे विधान गिरीश बापट यांनी केलं आहे.

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारने रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अजूनही रिक्षाचालकांना याचा लाभ मिळाला नसल्याने भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील RTO कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी यांच्याबरोबर भाजपचे कार्यकर्तेही आंदोलनाला बसले होते. तेव्हा आंदोलनात असणारा व्यक्ती बापट यांच्या मागे बसला होता. त्यावेळी एकजण म्हणाला, बापट साहेब तुमच्या मागे ईडी (ED) बसला आहे. (त्या बसलेल्या आंदोलनकर्त्याचा नावाचा शॉर्ट फॉर्म ED होता.) हे ऐकताच अशा ईडी फिडीला  मी काय घाबरत नाही,आजपर्यंत अनेक आंदोलनं केली असून आमच्याकडे ईडीला (ED) येऊन काय मिळणार आहे. आमच्या खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळणार, अशा विधानावरून आंदोलनकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.

अधिक वाचा  विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर - पृथ्वीराज चव्हाण

पुढे गिरीश बापट म्हणाले, करोना महामारीमुळे संपूर्ण बाजार पेठ ठप्प झाली असून त्यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांचे जगणे मुश्किल झाले. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महिन्याभरापूर्वी १ पॅकेज जाहीर केले गेले. त्यात रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य देण्याचे नमु केले आहे. परंतु, अद्यापही कोणाच्याही खात्यात ती रक्कम जमा न झाल्याने आज आम्ही RTO कार्यालयाच्या पायऱ्यांवर मूक आंदोलन करीत आहोत, सरकारने या घटकाला लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love